अंघाेळ करणाऱ्या मुलींचे ताे करायचा व्हिडीअाे शुटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:24 IST2018-09-01T20:40:47+5:302018-09-01T21:24:59+5:30

हाॅस्टेलमधील मुलींचे अंघाेळ करतानाचे व्हिडीअाे शुटींग करणाऱ्या तरुणाला मुलींनी रंगेहाथ पकडले.

police arrested one for molesting girls | अंघाेळ करणाऱ्या मुलींचे ताे करायचा व्हिडीअाे शुटींग

अंघाेळ करणाऱ्या मुलींचे ताे करायचा व्हिडीअाे शुटींग

पुणे : कोथरुडमधील एका हॉस्टेलमधील मुलींचे अंघोळ करतानाचा व्हिडिओ  काढण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. मोबाइलद्वारे बाथरुममधील व्हिडीओ शुटिंग काढण्याच्या तयारीत असतानाच एका मुलीने त्याचा मोबाइल हिसकावला.  

                        याप्रकरणी २५ वर्षीय मुलीने कोथरूड पोलिसांत तक्रार दिली असून त्यानुसार २९ वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो सनदी लेखापाल अभ्यासक्रम करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने व्हिडीओ काढण्यासाठी मोबाइल हातात ठेवून बाथरुमध्ये धरला. तेवढ्यात फिर्यादी यांनी त्याला पकडले. ही बाब  हॉस्टेलच्या मुलींना ताबडतोब पोलिसांनी कळवली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी हा सकाळच्या वेळी बाथरुम शेजारी थांबत व हॉस्टेलमधील मुली आंघोळ करण्यासाठी आल्या असता त्यांची मोबाइलमध्ये शुटींग करीत. ही बाब एका विद्यार्थीनिच्या लक्षात लक्षात आल्याने शुक्रवारी आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. पुढील तपास कोथरूड पोलीस करीत आहेत. 

Web Title: police arrested one for molesting girls