बंटी पवार टाेळीच्या सराईत गुन्हेगाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 16:51 IST2018-10-22T16:50:08+5:302018-10-22T16:51:12+5:30

सापळा रचून सराईत गुन्हेगाराला पाेलिसांनी अटक केली अाहे. त्याच्याकडून एक पिस्टल अाणि दाेन जिवंत काडतुसे जप्त करण्यात अाली अाहेत.

police arrested member of bunty pawar gang | बंटी पवार टाेळीच्या सराईत गुन्हेगाराला अटक

बंटी पवार टाेळीच्या सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे :  पिस्तूलाची तस्करी करणाऱ्या बंटी पवार टाेळीच्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड राेड पाेलिसांनी अटक केली अाहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व दाेन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात अाली अाहेत. दुर्गा बाबु महताे (वय 30 रा. वडगाव) याला पाेलिसांनी अटक केली असून त्याच्या विराेधात अार्म अॅक्टच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

    पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महताे हा तुकाईनगर सर्कल जवळ उभा असल्याची माहिती सिंहगड राेड पाेलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचारी दयानंद तेलंगे पाटील अाणि दत्ता साेनवणे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्याच्या कमरेला पिस्टल सदृश्य काहीतरी लावल्याचे खबऱ्याने पाेलिसांना सांगितले. ही माहिती मिळताच पाेलिसांनी तुकाईनगर सर्कल येथे सापळा रचून महताे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल अाणि दाेन जिवंत काडतुसे सापडली.

    महताे हा बंटी पवार टाेळीचा सदस्य असून ताे शस्त्र तस्कर अाहे. त्याच्या ताब्यातून यापूर्वी अाठ गावठी पिस्टल हस्तगत करण्यात अालेली अाहेत. त्याच्यावर वारजे, दत्तवाडी, सिंहगड राेड पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल अाहेत. 
 

Web Title: police arrested member of bunty pawar gang