शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

'पीएमआरडीए' कडून १३ राखीव भूखंडाचा लिलाव ; नागरिकांचा तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 1:02 PM

'पीएमआरडीए' ने वाघोली मांजरी, हिंजवडी, माण आणि भुकूममधल्या एकूण 13 भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा ( पीएमआरडीए) ने हिंजवडी आणि वाघोली मधल्या अमेनिटी स्पेस भाडेतत्वाने देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयी सुविधा न देता त्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या जागांचा लिलाव नेमका कशासाठी असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.  

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच 'पीएमआरडीए'ने नुकतीच एक सूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार वाघोली मांजरी, हिंजवडी, माण आणि भुकूममधल्या एकूण 13 भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. या सूचनेनुसार पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी या जागा दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

पण या परिसरात मुळातच सोयी-सुविधांचा अभाव आहे त्यामुळे हा लिलाव नेमका कशासाठी असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. विरोध नोंदवणारी पत्र नागरिकांच्या वतीने पीएमआरडीए ला पाठवण्यात आली आहेत. या विषयी बोलताना संजीव पाटील हे वाघोली चे रहिवासी म्हणाले , " पीएमआरडीए जागा भाडेतत्वावर देत 30 कोटी रुपये कमावण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुळात साधारण वर्षाकाठी तीनशे ते चारशे कोटी रुपये उत्पन्न वेगवेगळ्या प्रकल्पाकडून मिळत असेल तर हा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

वाघोलीत कचरा प्रकल्पांची पिण्याच्या पाण्यासाठी सोय करण्याची आणि रस्ते बांधण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. बिल्डरकडून यासाठी पीएमआरडीए ला निधी देखील देण्यात आलेला आहे. या जागा दवाखाने तसेच क्रीडांगण या‌कारणांसाठी वापरले जानेे आवश्यक आहे. पण असे न करता पीएमआरडीए जागांचा लिलाव कशासाठी करतोय हे स्पष्ट होत नाही." 

रविंद्र सिन्हा हे रहिवाशी लोकमत' शी बोलताना म्हणाले ," पीएमआरडीए कडून त्यांच्या हद्दीतील जागांचा विकास आराखडा अजून तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे यातल्या कोणत्याही जागेवरती कसलेही आरक्षण नोंदवले गेले‌ नाहीये. जिथे लिलाव करण्याचा निर्णय घेतला त्या भागामध्ये कचरा प्रकल्प पाणीपुरवठा अशा सोयी सुविधा देखील नाहीयेत. मग पीएमआरडीए कडून हा निर्णय नेमका कशासाठी घेतला जातो आहे असा सवाल उपस्थित होतोय " 

याबाबत आम्ही पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली काही दिवसांपूर्वीच पुणे महापालिकेने देखील अशाच पद्धतीने अमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आता पीएमआरडी हद्दीतही हा वाद सुरू झाल्याने नेमका काही धोरणात्मक निर्णय घेतला जातोय का ते पाहावे लागेल.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhinjawadiहिंजवडीwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीस