शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीएला लवकरच मुहूर्त

By admin | Updated: March 4, 2015 23:38 IST

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेला लवकरच मुहूर्त सापडणार असून, नगरविकास विभागाने पीएमआरडीएची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली

पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेला लवकरच मुहूर्त सापडणार असून, नगरविकास विभागाने पीएमआरडीएची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच पुण्याच्या प्रश्नांबाबत तीन महिन्यांपूर्वी विधानभवन येथे धावती बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास सांगितले होते. हे प्राधिकरण केवळ नियोजनापुरते न ठेवता एमएमआरडीए सारखी लँड बँक किंवा हैदराबाद पॅर्टनचा विचार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने पीएमआरडीए स्थापनेसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे धूळखात पडून आहे. पुण्यासाठी पुणे महानगर समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाहतूक आणि इतर विकासकामांचे आराखडे तयार करण्याचे कामदेखील सुरू केले आहे; पंरतु या विकास आराखड्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एमएमआरडीएसारखे स्वतंत्र पीएमआरडीए स्थापन करणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव चार वर्षांपासून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता; परंतु समिती स्थापन झाल्यावर त्याचे अध्यक्षपद कोणाकडे द्यावयाचे, यावरून काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये वाद निर्माण झालाहोता. त्यात ‘दादा’ आणि ‘बाबा’ दोघांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने सत्तेच्या काळात अखेरच्या क्षणापर्यंत हा प्रस्ताव मंजूर झाला नाही.(प्रतिनिधी)४पीएमआरडीए स्थापन झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे,खडकी, देहूरोड कॅन्टोमेंट यांच्यावबोरबर लोणावळा, तेळगाव,शिरुर, भोर, सासवड आणि दौंड नगरपालिका यांच्या एकत्रित विकासाचे नियोजन करणे आणि अंंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. रिंगरोडची अंमलबजावणी पीएमआरडीए करणार४पुणे शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा रिंगरोडच्या प्रकल्पाची अंमलबजावणी सध्या नक्की कोणी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु पीएमआरडीए स्थापन झाल्यास हा प्रश्न मार्गी लागणार असून, पीएमआरडीए मार्फत रिंगरोडची अंमलबजावणी करण्यात येईल.