शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए आराखडा शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा : भेगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

विकास आराखड्यातील समस्या व हरकती संदर्भात तळेगाव ढमढेरे येथे जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित नागरिक ...

विकास आराखड्यातील समस्या व हरकती संदर्भात तळेगाव ढमढेरे येथे जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित नागरिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे बोलत होते.

विशेषता नदीकडेच्या गावात पूररेषा थेट गावात दाखवल्याने वर्षानुवर्षे राहणाऱ्या अनेक लोकांची घरे बाधित होत आहेत. तसेच या आराखड्यातील तरतुदींची माहिती देऊन हरकत कशी नोंदवायची, त्याची पद्धत काय याविषयी या वेळी जनजागृती करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात येईल, असे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही आक्रमक भूमिका घेत पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सात हजार चौरस किलोमीटर झोनिंग झालेले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याने बाधित शेतकऱ्यांना घेऊन लवकरच पुणे प्रदेश विकास महामंडळ (पीएमआरडीए) यांच्या कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश सचिव शिवाजीराव भुजबळ, श्रीकांत सातपुते यांनी मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, रोहिदास उंद्रे, जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, भाजपाचे तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे, बाळासाहेब चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भगवान शेळके, सचिव राजेंद्र ढमढेरे, कैलास सोनवणे, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष जयेश शिंदे, उपाध्यक्ष संदीप ढमढेरे, श्रीकांत सातपुते, पंडित भुजबळ, रोहित खैरे, सूरज चव्हाण, तुळसीराम दुंडे, माऊली बहिरट,रवींद्र दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रघुनंदन गवारे यांनी केले. आभार नवनाथ भुजबळ यांनी मानले.

(फोटो ओळ : तळेगाव ढमढेरे येथे आयोजित जनजागृती मेळाव्याला मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे)

310821\img_20210830_170753.jpg

तळेगाव ढमढेरे येथे जनजागृती मेळाव्याला मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे