शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:05 PM

महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त माजी सैनिक असून, यांपैकी ३० टक्के माजी सैनिकांच्या विधवा आहेत.

ठळक मुद्देमाजी सैनिक हे चालक म्हणून तर माजी सैनिकांच्या पत्नी अथवा विधवा वाहक म्हणून कार्यरत घेण्यात येणा-या बसेस या निविदा प्रक्रियेतील सर्व अटी, शर्ती लागू करूनच घेण्यात येणार

पुणे: माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांना आधार देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) या महिलांच्या बचत गटांकडून सुमारे ४० बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी झालेल्या पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक व पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते.      पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की,  महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त माजी सैनिक असून, यांपैकी ३० टक्के माजी सैनिकांच्या विधवा आहेत. या महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या मुळ उद्देशाने बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या महिला बचत गटांच्या ४० बसेस पीएमपीएमएल भाडेतत्त्वावर घेईल असा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे विधवा व माजी सैनिकांचे पुनर्वसन होण्यास हातभार लागेल व माजी सैनिकांना रोजगार निर्मिती होण्यासाठी देखील मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र व राज्य स्तरावर माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याण निधीतून महिला बचत गटांना या बस घेता येणार आहेत.माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांच्या बचत गटाकडून घेण्यात येणा-या बसेस या निविदा प्रक्रियेतील सर्व अटी, शर्ती लागू करूनच घेण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलच्या स्पेसिफिकेशन प्रमाणेच या बसेचा पुरवठा करण्यात येईल. या भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या बसेस मध्ये माजी सैनिक हे चालक म्हणून तर माजी सैनिकांच्या पत्नी अथवा विधवा या वाहक म्हणून कार्यरत असतील असे सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPMPMLपीएमपीएमएलMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका