शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ला मिळाले २७ कोटी

By admin | Updated: January 7, 2015 00:38 IST

महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

पुणे : तोट्यातील ‘पीएमपी’वर केवळ टीका आणि टीकाच करून, आर्थिक मदत देण्यास आखडता हात घेणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यात नगर आणि आळंदी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गासाठी आयटीएमएस प्रणालीसाठी ११ कोटी ९७ लाख रुपये, पीएमपीची संचलन तूट भरून काढण्यासाठी १० कोटी रुपये; तसेच विद्यार्थी पास योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे तोट्यातील पीएमपीला आर्थिक हातभार लागणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी ही माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, पीएमपीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याने आधी कारभार सुधारावा, त्यानंतर निधी द्यावा, अशी भूमिका समिती सदस्यांकडून घेतली जात होती. मात्र, पीएमपीच्या सुधारणेसाठी प्रशासकीय कारभार मुद्रांक शुल्क आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनीही पीएमपी सक्षम करण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून हा निधी मंजूर केला असल्याचे कर्णे यांनी सांगितले, तर डॉ. परदेशी यांच्याकडे पदभार असल्याने मनसेचाही त्यास विरोध राहणार नसल्याचे गटनेते बाबू वागसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)‘पीएमपी’साठी ‘स्थायी’ची खास सभा ४तोट्यातील पीएमपी बाहेर काढण्यासाठी; तसेच पीएमपीच्या सुधारणेसाठी भविष्यात केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यासाठी पुढील मंगळवारी स्थायी समितीने विशेष बैठक बोलाविली आहे. या बैठकीत डॉ. श्रीकर परदेशी सादरीकरण करणार असून, स्थायी समितीपुढे पीएमपीसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांसाठीची माहिती देणार असल्याचे कर्णे यांनी या वेळी सांगितले.पीएमपीला ‘अच्छे दिन’४पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे पीएमपीला नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ४यामध्ये बिघाड झालेल्या गाड्यांची समस्येचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत होता. पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या निधीतून पीएमपीचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. ४यामुळे पीएमपीच्या प्रवाशांमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. पीएमपी शहरासहीत जिल्ह्याच्या काही भागात जाते. ४एकूणच तोट्यात गेलेल्या पीएमपीला ‘अच्छे दिन’ आले असल्याचेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.