शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

पीएमपीने '' एमएनजीएल '' ला दिले २७ कोटी; '' सीनजी ''चा प्रश्न सुटण्याची चिन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 7:29 PM

पीएमपीने थकित रक्कम न दिल्यास कंपनीने सीएनजी पुरवठा शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्याचा इशारा दिला होता.

ठळक मुद्दे थकित रक्कम सुमारे ४७ कोटी २२ लाख रुपये सीएनजी पुरवठा बंद केल्यास संपुर्ण बस वाहतुक कोलमडून जाणार

पुणे : सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शुक्रवारी (दि. २४) दिवसभर जोरदार हालचाली करून एमएनजीएल २७ कोटी रुपये दिले. दरम्यान, सीएनजी पुरवठा सुरूच ठेवण्याबाबत अद्याप एमएनजीएलकडून निर्णय घेण्यात आलेला नाही.एमएनजीएल ने दि. २२ मे रोजी पीएमपीशी पत्रव्यवहार करून एकुण थकित रक्कम सुमारे ४७ कोटी २२ लाख रुपये देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये सन २०१४ पासून दि. १० मेपर्यंतची थकित रक्कम सुमारे २३ कोटी ९३ लाख रुपयांसह त्यावरील व्याज सुमारे १८ कोटी ६ लाख व जीएसटी ५ कोटी २२ लाख रुपयांचा समावेश आहे. ही रक्कम न दिल्यास कंपनीने सीएनजी पुरवठा शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पीएमपीचे धाबे दणाणले. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ११४० बस सीएनजीवर धावतात. पुरवठा बंद केल्यास संपुर्ण बस वाहतुक कोलमडून जाणार होती. असे झाले असते तर प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असता. तसेच त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असता. याअनुषंगाने पीएमपी प्रशासनाने तातडीने हालचाली करून महापालिकेकडे पैशांची मागणी केली. याचे गांभीर्य ओळखून पालिकेनेही संचलन तुटीपोटी २४ कोटी रुपये आगाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळपर्यंत ही रक्कम ह्यएमएनजीएलह्णच्या खात्यात जमा करण्यात आली. तत्पुर्वी सकाळी पीएमपी प्रशासनाने तीन कोटी रुपये ह्यएमएनजीएलह्णला दिले. त्यामुळे दिवसभर पीएमपीने एकुण २७ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. --------व्याज, जीएसटीचा निर्णय प्रलंबितथकित रकमेवरील व्याज व जीएसटीची रक्कम पीएमपीने दिलेली नाही. शुक्रवारी देण्यात आलेले २७ कोटी हे दि. १० मेपर्यंतची थकित रक्कम सुमारे २३ कोटी व मे अखेरपर्यंत होणारे बिल आगाऊ देण्यात आले आहे. व्याज व जीएसटीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ------------आतापर्यंतची थकित रक्कम व मे महिन्याची आगाऊ रक्कम असे एकुण २७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे एमएनजीएलने अत्यावश्यक प्रवासी वाहतुक बस सेवा विचारात घेऊन ही सेवा सुरळित ठेवण्यासाठी सीएनजी पुरवठा विनाखंडीत सुरू ठेवावा.- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी----------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल