शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुण्याच्या बिबेवाडीत भाजपचा डंका! प्रभाग २० मध्ये 'कमळ' फुलले; गौरव घुलेंनी राखली राष्ट्रवादीची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:50 IST

PMC Election Results 2026 प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्षाने वर्चस्व गाजवले आहे. या प्रभागातील चार जागांपैकी तीन जागांवर भाजपने विजय मिळवला आहे

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा पहिला अधिकृत निकाल हाती आला असून, प्रभाग क्रमांक २० (शंकर महाराज मठ - बिबेवाडी) मध्ये भारतीय जनता पक्षाने वर्चस्व गाजवले आहे. या प्रभागातील चार जागांपैकी तीन जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला रोखले आहे. 

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

विजेत्या उमेदवारांची यादी: १. राजेंद्र शिळीमकर (भाजप) - विजयी २. तन्वी दिवेकर (भाजप) - विजयी ३. मानसी देशपांडे (भाजप) - विजयी ४. गौरव घुले (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी

महेंद्र सुंदेचा यांचा पराभव

 या प्रभागात सर्वात मोठी धक्कादायक घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला आहे. भाजपची या प्रभागात क्लिन स्वीप (४-०) करण्याची संधी हुकली असली तरी, तीन जागा जिंकून भाजपने बिबेवाडीत आपला गड कायम राखला आहे.

पुण्यातील स्थिती

प्रभाग २० मधील या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून पुण्याच्या इतर प्रभागांमध्येही भाजप सध्या अनेक ठिकाणी आघाडीवर आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव घुले यांच्या विजयाने महाविकास आघाडीनेही (MVA) भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Bibvewadi in Pune PMC Election; NCP Claims One Seat

Web Summary : BJP secured three of four seats in Bibvewadi (Ward 20) in Pune's PMC election. Nationalist Congress Party's Gaurav Ghule won the remaining seat, defeating BJP's Mahendra Sundecha. Despite this, BJP maintained its stronghold, with party workers celebrating their victory and lead in other wards.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार