PMC Budget 2026: स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:21 IST2026-01-20T14:21:53+5:302026-01-20T14:21:53+5:30

PMC Budget 2026 पुणे महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक सुमारे १५ हजार कोटींच्या आसपास जाणार आहे

PMC Budget 2026 Priority given to cleanliness, water supply, new road works; Pune Municipal Corporation to present budget by January 30 | PMC Budget 2026: स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट

PMC Budget 2026: स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट

पुणे : पुणे महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे बजेट येत्या ३० जानेवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि नवीन रस्त्यांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे महापालिकेची निवडणूक झाली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक पालिकेच्या सभागृहात येणार आहेत. महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त तयार करतात. अगोदरच्या वर्षांचे डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष उत्पन्न, पुढील तीन महिन्यांत अर्थात मार्चअखेरपर्यंत मिळणारे उत्पन्न, शासनाकडून येणारा निधी आदींचा यामध्ये समावेश असतो. नियमानुसार साधारण आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केल्यानंतर स्थायी समिती ते अंदाजपत्रक अंतिम करून सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाते. परंतु, यंदा १५ डिसेंबरपासून निवडणुकीची व त्यापूर्वी प्रभाग रचना व मतदारयाद्यांच्या कामामुळे महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक विहित मुदतीत सादर होऊ शकले नाही. त्यामुळे येत्या ३० जानेवारीपर्यंत बजेट सादर केले जाणार आहे.

पालिकेचे बजेट १५ हजार कोटींपर्यंत जाणार

महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक सुमारे १५ हजार कोटींच्या आसपास जाणार आहे. त्यात राज्य सरकारकडून समाविष्ट गावांचा सुमारे २ हजार कोटी जीएसटी, मुद्रांक शुल्क अधिभार व विविध योजनांतील राज्य सरकारच्या अनुदानाचाही समावेश या अंदाजपत्रकात असणार आहे.

Web Title : पुणे नगर निगम बजट 2026: स्वच्छता, पानी, सड़कों को प्राथमिकता

Web Summary : पुणे का 2026-27 का नगर निगम बजट, लगभग ₹15,000 करोड़, स्वच्छता, पानी की आपूर्ति और सड़क विकास को प्राथमिकता देता है। चुनावों के कारण देरी हुई, बजट 30 जनवरी तक पेश किया जाएगा, जिसमें राज्य सरकार के अनुदान और शामिल गांवों से जीएसटी राजस्व शामिल है।

Web Title : Pune Municipal Corporation Budget 2026 prioritizes sanitation, water, and roads.

Web Summary : Pune's 2026-27 municipal budget, nearing ₹15,000 crore, prioritizes sanitation, water supply, and road development. Delayed due to elections, the budget will be presented by January 30th, including state government grants and GST revenue from included villages.