शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीमध्ये ‘पास’ घोटाळा

By admin | Updated: July 4, 2015 00:17 IST

सुमारे अडीच लाख रुपये रकमेच्या पासची विक्री करूनही एका महिला कर्मचाऱ्याने ही रक्कम पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएमएल) जमा केलीच नसल्याचा प्रकार

पुणे : सुमारे अडीच लाख रुपये रकमेच्या पासची विक्री करूनही एका महिला कर्मचाऱ्याने ही रक्कम पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएमएल) जमा केलीच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सुमारे अडीच महिने पास विभाग तसेच पीएमपी प्रशासनाला याचा थांगपत्ताही नव्हता. मागील आठवड्यात झालेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. संबंधित महिलेला निलंबित केले आहे. ही महिला अनुकंपा तत्त्वावर झाडूवाला म्हणून पीएमपीत नोकरी करीत होती. मात्र, तिला पास केंद्रांवर काम देण्यात आले होते.पीएमपीला तिकीट विक्रीबरोबरच पास विक्रीतूनही मोठे उत्पन्न मिळते. पुणे व पिंपरी चिंचवडसह हद्दीबाहेरील लाखो प्रवासी पीएमपीच्या सुविधेचा फायदा घेतात. त्यामुळे दोन्ही शहरांत ४५ पास केंद्रे आहेत. या प्रत्येक केंद्रावर प्रत्येक पाळीमध्ये एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते. या कर्मचाऱ्यांना मागणीनुसार पास पुरविले जातात. दररोज झालेली पास विक्री व त्याची माहिती संबंधित आगारामध्ये द्यावी लागते. तसेच विक्रीतून जमा झालेली रक्कमही आगारात जमा करावी लागते. उर्वरित पास केंद्रातच ठेवले जातात. साधारणत: एप्रिल महिन्याच्या मध्यात प्रत्येक पास केंद्रातील पास तसेच इतर माहितीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर जूनच्या अखेरच्या महिन्यात ही तपासणी झाली. दरम्यानच्या काळात संबंधित महिला आनंदनगर पास केंद्रावर होती. या तपासणीत तिने विक्री केलेले पास व जमा केलेल्या रकमेत तफावत आढळून आली. याबाबत विभागातील अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता सुमारे अडीच लाख रुपयांचा घोटाळा समोर आला. ‘संबंधित विभागप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंंतर या महिलेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे,’ असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी दीपकसिंग परदेशी यांनी सांगितले. आधीच पीएमपी तोट्यात असताना असे घोटाळे पीएमपीला अधिक खड्डयात नेणारे आहेत. या महिलेला अनुकंपा तत्त्वावर झाडूवाली म्हणून पीएमपी सेवेत घेतले होते. प्रत्यक्षात तिला पास केंद्रात काम करण्यात सांगण्यात आले. पीएमपीमध्ये अशा सुमारे ३० झाडूवालीपदावरील महिला पास देण्याचे काम करीत आहेत. पास केंद्रात लेखनिक किंवा वाहकांची नेमणूक होणे अपेक्षित असताना या महिलांना काम देण्यात आले आहे.