शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन; तब्येतीची विचारपूस केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:51 IST

शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात चांगली सुधारणा होत असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी दिली आहे

पुणे : राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याच्या कारणास्तव सोमवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. रुबीचे संचालक डॉ. सायमन ग्रॅण्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत काही चाचण्या सामान्य असल्याचे निदर्शनास आले असून, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

 गेल्या काही दिवसांतील सततच्या धावपळीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता. छातीत थोडा कफ असल्याने श्वसन तपासणीही करण्यात आली आहे. सध्या त्यांना खासगी कक्षात ठेवण्यात आले होते. आज सकाळी शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात चांगली सुधारणा होत असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिली. पवार यांचे सर्व जीवनसत्त्वीय निकष (व्हायटल पॅरामिटर्स) सामान्य मर्यादेत असून त्यांची एकूण प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात दाखल होताना जाणवलेला सौम्य त्रास उपचारांमुळे आता कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अद्याप निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या ठराविक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व तपासण्या नियमितपणे करण्यात येत आहेत. पुढील उपचारांबाबतचे निर्णय पवार यांच्या प्रकृतीतील प्रगती लक्षात घेऊन घेण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

त्यानंतर आज सकाळी शरद पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार असल्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi Calls Sharad Pawar, Enquires About His Health

Web Summary : Sharad Pawar was admitted to Ruby Hall Clinic, Pune, due to breathing difficulties. PM Modi called to inquire about his health. Pawar's condition is stable and improving; discharge is expected soon.
टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर