प्लॉट आहे, पण बांधता येत नाही घर !

By Admin | Updated: July 3, 2014 05:44 IST2014-07-03T05:44:09+5:302014-07-03T05:44:09+5:30

स्वत:च्या मालकीचा छोटा प्लॉट आहे, पण त्यावर घर बांधता येत नाही... याला कारण काय

Is a plot, but can not build a house! | प्लॉट आहे, पण बांधता येत नाही घर !

प्लॉट आहे, पण बांधता येत नाही घर !

संजय माने, पिंपरी
स्वत:च्या मालकीचा छोटा प्लॉट आहे, पण त्यावर घर बांधता येत नाही... याला कारण काय? तर शेकडो कागदपत्रे आणि चारही बाजूंनी सोडावे लागणारे विशिष्ट अंतर! कागदपत्रे जमविताना आणि परवानगीसाठी हेलपाटे मारताना माणसं अगदी दमून जातात, तर ठरावीक फूट जागा सोडून नकाशा बनवायचा तर उरलेल्या इवल्याशा जागेत घर उभारायचं कसं या विचाराने मलूल होऊन जातात... यातूनच काहींनी धाडस दाखवून धोक्याचा मार्ग अवलंबला-विनापरवाना बांधकामाचा. परंतु तोच अनेकांच्या मुळाशी आला आहे. याचाच धसका घेऊन अनेकांनी भाड्याच्या घरात राहणे पसंत करून आपला प्लॉट रिकामाच ठेवला आहे. अशा रिकाम्या प्लॉटची संख्या आहे ५ हजार! छोट्याशा प्लॉटमध्येही घर बांधता येईल यासाठी नियमावलीत शिथिलता आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे.

Web Title: Is a plot, but can not build a house!