शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिकाचे करावे तेवढे कौतुक कमीच! ताशी २२२ किमी. वेग असताना टळला विमानाचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 20:53 IST

उड्डाणावेळी धावपट्टीवर आली जीप : १८० प्रवासी होते विमानात 

ठळक मुद्दे विमानाचा खालचा भाग धावपट्टीला घासून गेल्याने विमानाचे नुकसान जवळपास ताशी २२२ किमी असल्याने शक्य नव्हते विमान थांबविणे

पुणे : पुणेविमानतळावर एअर इंडियाच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानातील १८० प्रवासी अपघातातून थोडक्यात बचावले. विमान उड्डाण करताना धावपट्टीवर अचानक जीप आडवी आली. या प्रकारामुळे वैमानिकाने काही अंतर आधीच उड्डाण केले. त्यामुळे विमानाचा खालचा भाग धावपट्टीला घासून गेल्याने विमानाचे नुकसान झाले. दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे विमान उतरल्यानंतर ही बाब लक्षात आली. वैमानिकाने दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे विमानतळावर मोठा अपघात टळला. एअर इंडिया कंपनीचे विमान (एआय ८५२) सकाळी ७.५५ वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीकडे उड्डाण करणार होते. त्यानुसार सुमारे १८० प्रवासी व कर्मचाऱ्यांना घेऊन हे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले. उपलब्ध माहितीनुसार, धावपट्टीवरून पुढे जात असताना काही अंतरावर एक जीप उभी असल्याचे वैमानिकाचे लक्षात आले. विमानाचा वेग जवळपास ताशी २२२ किमी असल्याने विमान थांबविणे शक्य नव्हते. त्यामुळे नियोजित अंतराआधीच वैमानिकाने तातडीने विमानाचे उड्डाण केले. पण हे विमान धावपट्टीला घासून गेल्याने मागील बाजुचे विमानाचे आवरण निघाले. त्यानंतरर दिल्ली विमानतळावर हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात झाला नाही. हेच विमान पुढे श्रीनगरला जाणार होते. त्याआधी तपासणी करताना विमानाचा खालील भागाला काहीतरी घासल्याचे लक्षात आले. त्यानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. नागरी विमानवाहतुक महासंचालनालया(डीजीसीए) ने घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी सुरू केली आहे. पुणे विमानतळ हे भारतीय हवाई दलाचे आहे. त्यामुळे या विमानतळावर हवाई दलाच्या नियमित कामे सुरू असतात. त्यामुळे ‘डीजीसीए’ने एअर ट्रॅफिक कंट्रोलचे रेकॉर्डिंग ठेवण्यास सांगितले आहे. तसेच एअर इंडियाकडूनही कॉकपीटमधील ध्वनीमुद्रणही मागविण्यात आले आहे. चौकशीसाठी हे विमान सेवेतून बाहेर काढण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.------------श्रीनगरला उड्डाण करणाºया विमानाच्या मागील बाजुला काही घासल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे विमान चौकशीसाठी सेवेतून बाजुला करण्यात आले आहे. कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि सॉलीड-स्टेट फ्लाईट डाटा रेकॉर्डर (एसएसएफडीआर) द्वारे माहिती मिळविली जाईल. - धनंजय कुमार, प्रवक्ते, एअर इंडिया------------

  धावपट्टीवर विमानाने ठराविक वेग घेतल्यानंतर ते अचानक थांबविणे शक्य नसते. त्यामुळे धावपट्टीवर जीप दिसल्यानंतर वैमानिकाने तातडीने उड्डाण करण्याचा निर्णय घेतला असावा. पण अचानक उड्डाणामुळे विमानाची पुढील बाजु थोडी अधिक वर गेली असेल. त्यामुळे मागील बाजुला धावपट्टीला घासली. वेगात असलेले विमान थांबविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित विमान जीपला धडकले असते. त्यामुळे वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक आहे. पण त्याचवेळी विमान धावपट्टीला घासल्यानंतर ते त्यांच्या लक्षात येणे अपेक्षित होते. कदाचित लक्षात आले असले तरी कोणताही धोका नसल्याने ते दिल्लीपर्यंत नेण्यात आले असावे. पण धावपट्टीवर विमान उड्डाणावेळी अशाप्रकारे जीप येणे, ही बाब खुपच गंभीर आहे. एअर ट्रॅॅफिक कंट्रोलची ही जबाबदारी असून मानवी चुक आहे. याबाबत सखोल चौकशी व्हायला हवी.- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतुक तज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानAccidentअपघातpilotवैमानिक