शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन, त्या दोघांना पिस्तुलासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:53 IST

गँगस्टर शरद मोहोळचा (दि. ५ जानेवारी) भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

- किरण शिंदे

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा ५ जानेवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. कोथरूड येथील सुतारदरा भागात शरद मोहोळ याच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला उद्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना अटक केली आहे.शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या ताब्यातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांना अटक केली असली तरीही यात आणखी काही जणांचा समावेश आहे. आणि लवकरच त्यांनाही अटक केली जाईल अशी ही माहिती समोर आली आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांनीही शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यासाठी या दोघांनी पिस्तूल हे आणले होते. आणि हे दोघेही संधीच्या शोधात होते. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्यांच्या या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी या दोघांना सापळा नाटक केली. या संपूर्ण कटात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुणे पोलीस आता तपास करत आहेत. या आरोपींच्या निशाण्यावर कोण होते? त्याच्या या कटात आणखी कोण सहभागी आहे? याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. 

गँगस्टर शरद मोहोळचा (दि. ५ जानेवारी) भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहन सोबत सतत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. शरद मोहोळ याच्यावर ३ जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यात १७ आरोपी निष्पन्न झाले. मुळशीतील विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुंड विठ्ठल शेलारसह १७ जनांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड