शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी उड्डाणपुलाचा कठडा कोसळला

By admin | Updated: June 30, 2015 23:25 IST

वीस वर्षांपूर्वीचा शहरातील पहिला उड्डाणपूल इंदिरा गांधी उड्डाणपूल म्हणून ओळखला जातो. या पुलाचा रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कठडा तुटला.

पिंपरी : वीस वर्षांपूर्वीचा शहरातील पहिला उड्डाणपूल इंदिरा गांधी उड्डाणपूल म्हणून ओळखला जातो. या पुलाचा रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कठडा तुटला. सकाळी पुलाच्या खालील बाजूस वर्दळ कमी असल्याने कोणी जखमी झाले नाही. अत्यंत वर्दळीच्या या पुलावर दोन दिवसांपूर्वी दुर्घटना घडली. तातडीने दखल घेऊन दुरुस्ती होणे अपेक्षित असताना, प्रशासन मात्र दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू केले आहे.वाहतूक पोलीस सकाळी ९नंतर पुलावर थांबतात. वाहतूक पोलीस येण्यापूर्वीच एका वाहनाने ठोकर दिल्याने पिंपरीकडे जाण्याच्या मार्गावर डावीकडील कठडा तुटला. सिमेंट, विटांचे तुकडे खाली पडले. पुलाखाली बसणारे भाजीविक्रेते येण्यापूर्वी ही घटना घडली असल्याने कोणाला इजा झाली नाही. पुलाच्या कठड्याचे खाली पडलेले तुकडे, राडारोडा उचलण्याची घाई करण्यात आली. कठडा तुटला, त्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली. त्याबद्दल मात्र कोणी दखल घेतलेली नाही. या पुलावरून चिंचवड लिंक रस्ता येथे, तसेच काळेवाडी, पिंपरी, कॅम्प, पिंपरी गावाकडे जाण्यास मार्ग आहे. त्यामुळे नेहमीच या पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असते. हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या पुलावर निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती बदलण्यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही दखल घेतली नाही. तुटलेला कठडा, तसेच अन्य ठिकाणी कमकुवत झालेला पूल मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, १९८४मध्ये बांधलेल्या या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतल्यास नेमक्या सुधारणा काय करायच्या, हे निश्चित होऊ शकेल, असे नागरिकांचे मत आहे. (प्रतिनिधी)