कारमध्ये बसू न दिल्यावरून जावयाचा सासूवर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:53 IST2025-11-28T15:51:30+5:302025-11-28T15:53:08+5:30
महिला तिच्या मुलीला भेटण्यासाठी कासारवाडी येथे कारने गेली.

कारमध्ये बसू न दिल्यावरून जावयाचा सासूवर चाकूहल्ला
पिंपरी : जावयाचा भाऊ व मित्रांना कारमध्ये बसू न दिल्याच्या कारणावरून जावयाने सासूवर चाकूने हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. २६) रात्री सव्वाएकच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.
अमित बाळासाहेब पिसाळ (वय ३६, रा. कासारवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत त्याच्या सासूने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिला तिच्या मुलीला भेटण्यासाठी कासारवाडी येथे कारने गेली.
त्यावेळी संशयिताचा भाऊ व त्यांच्या मित्रांना कारमध्ये बसण्यास घेतले नाही. या कारणामुळे संतापलेल्या संशयित जावयाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेचे डोके भिंतीला आपटले. संशयिताने धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केली.