शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video: पिंपरीत भरस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले; धक्कादायक प्रकार सिसिटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 12:48 IST

पिंपरीच्या निगडी येथे घरातील भांडणातून पतीने पत्नीचा भररस्त्यात गळा दाबून रस्त्यावर आपटल्याचा धक्कादायक प्रकार सिसिटीव्हीत कैद झाला आहे

पुणे : पिंपरीच्या निगडी येथे घरातील भांडणातून पतीने पत्नीचा भररस्त्यात गळा दाबून रस्त्यावर आपटल्याचा धक्कादायक प्रकार सिसिटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना दोन जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले. पत्नीला पती विरोधात तक्रार आहे का? विचारण्यात आले. मात्र पत्नीने तक्रार देण्यास नकार दिला. दरम्यान, कौटुंबिक वादातून भांडण झाल्याने त्यांचं समुपदेशन करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. 

 महिला सुरुवातीला पायी रस्त्याने चालताना दिसत आहे. तर पती त्याच्या लाल रंगाच्या स्कुटीसोबत पुढे येऊन थांबलेला दिसतो आहे. आपल्या पत्नीला मागून येताना पाहून गाडीवरून उतरून त्याच क्षणी तो तिच्या मागे पळू लागतो. यावेळी तो पत्नीचा थेट गळा दाबतो. त्यानंतर तिला जोरात खाली आपटतो. यावेळी तो आपल्या पत्नीला रस्त्यावर लोळवतो. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे सर्व घडतंय तो चांगल्याच वर्दळीचा रस्ता दिसतोय. रस्त्याने गाड्यांची ये-जा सुरु आहे. भर दिवसा हा सगळा प्रकार घडला.

पती पत्नीच्या भांडणात होतीये वाढ 

आधुनिक युगात किरकोळ कारणावरून पती - पत्नीच्या भांडणांमध्ये वाढ होता दिसून येत आहे. अनेक जण तर कुठलाही विचार न करता विभक्त होण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत. तर काही ठिकाणी या वादामुळे पती अथवा पत्नीकडून रागाच्या भरात टोकाची पाऊले उचलली जात आहेत. अशा वेळी मारहाण, आत्महत्या असे अनेक प्रकारहि समोर येऊ लागले आहेत. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी