वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार;चिखली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:01 IST2025-06-04T15:59:48+5:302025-06-04T16:01:30+5:30

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेले होते. तिथे यश कपाट हॉलमध्येच लघुशंका करत होता.

Pimpri Chinchwad crime news man stabbed for refusing to urinate at birthday party | वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार;चिखली येथील घटना

वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार;चिखली येथील घटना

पिंपरी : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्राला लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार करण्यात आले. चिखली येथील म्हेत्रे वस्तीत सोमवारी (२ जून) रात्री ही घटना घडली.

विशाल गुरप्पा पाटील (३१, रा. चिखली, मूळ रा. येड्राव, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यश विनोद कपाट (रा. चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विशाल मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेले होते. तिथे यश कपाट हॉलमध्येच लघुशंका करत होता. त्याला स्वच्छतागृहामध्ये जाऊन लघुशंका करण्यास विशाल यांनी सांगितले. त्या रागातून यशने त्यांना धमकी दिली. त्यानंतर विशाल यांच्या मित्राने त्यांना म्हेत्रेवस्ती, चिखली येथे बोलावून घेतले. तिथे थांबलेल्या यश आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्यावर चाकूने वार करत हल्ला केला. त्यावेळी मित्राने चाकू हिसकावून घेतला असता यश याने लाकडाने मारून विशाल यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Pimpri Chinchwad crime news man stabbed for refusing to urinate at birthday party