माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे नाही तर...; आयटीनगरीत नवऱ्याच्या प्रेयसीचे केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 21:07 IST2025-08-21T21:06:30+5:302025-08-21T21:07:05+5:30

महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे” असे सांगत ऑफिसबाहेर बोलावून घेतले.

pimpri chinchwad crime news Leave my husband alone or else Husband's girlfriend kidnapped in IT city | माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे नाही तर...; आयटीनगरीत नवऱ्याच्या प्रेयसीचे केले अपहरण

माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे नाही तर...; आयटीनगरीत नवऱ्याच्या प्रेयसीचे केले अपहरण

पिंपरी : नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी पत्नीने भावाला व आईला घेऊन थेट प्रेयसीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी आयटी पार्कमध्ये 
उघड झाली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात बुधवारी (दि २१) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास विप्रो सर्कल, ब्रम्हा क्रॉप फेज २  येथे काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे” असे सांगत ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली. या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली.
 
पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली 
पोलिस नियंत्रण कक्षाला अपहरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये कोंबताना स्पष्ट दिसले. दिवसाढवळ्या आयटी पार्क परिसरात अपहरणाची घटना घडल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी गाडीचा क्रमांक शोधून काढला. तब्बल दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अपहृत महिलेचा शोध घेतला. वाकड परिसरातून कार ताब्यात घेऊन महिलेची सुटका केली. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला. 
 
'नवऱ्याचा नाद सोडून दे' अशी दिली धमकी 
कारमध्ये बसवून घेतल्यानंतर त्या महिलेने संतापून नवऱ्याच्या प्रेयसीला दम दिला. “माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”. त्यानंतर तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तब्बल दोन ते अडीच तास सुरू असलेल्या प्रकाराने महिला घाबरली होती.

Web Title: pimpri chinchwad crime news Leave my husband alone or else Husband's girlfriend kidnapped in IT city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.