तळवडे हादरले..! आयटी पार्क परिसरात दुहेरी हत्याकांड, ठेकेदार पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:45 IST2025-06-25T13:44:24+5:302025-06-25T13:45:32+5:30

या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान, ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

pimparichinchwad crime talwade shook Double murder in IT Park area, contractor in police custody | तळवडे हादरले..! आयटी पार्क परिसरात दुहेरी हत्याकांड, ठेकेदार पोलिसांच्या ताब्यात

तळवडे हादरले..! आयटी पार्क परिसरात दुहेरी हत्याकांड, ठेकेदार पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवडजवळील तळवडे येथील आयटी पार्क परिसर बुधवारी (२५ जून) सकाळी एका धक्कादायक घटनेने हादरला. डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला आणि एक पुरुषाचे मृतदेह आढळून आले. हे प्रकरण खुनाचे असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगला सूरज टेंभरे (३०, अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (५५, अकोला) अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेही तळवडे परिसरात वास्तव्यास होते. बुधवारी सकाळी त्यांचे मृतदेह निदर्शनास येताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान, ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे तळवडे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: pimparichinchwad crime talwade shook Double murder in IT Park area, contractor in police custody