पुणे : कात्रज परिसरातील रासकर पार्क, मांगडेवाडी येथील एका खाणीत ४० वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि. १०) मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी खून असल्याच्या संशयाने तपास सुरू केला होता. याप्रकरणी, गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून सहा जणांना मंगळवारी (दि. १७) अटक केली.
केशव कमलेश चौधरी (वय २०), सोन्या लक्ष्मण पवार (वय १९), अब्दुल महंमद शेख (वय २३, तिघे रा. भारतनगर, कात्रज ), महादेव अर्जुन व्होरडे (वय २१), साई अमित पुजारी (वय २२) आणि सोहेल हनीफ खान (वय २०, सर्व रा. कात्रज ) या सहा जणांना अटक केली. तपासासाठी त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे (वय ४०) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि.८) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास रासकर पार्क, मांगडेवाडी, कात्रज येथील क्रशर खाणीमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता. शवविच्छेदन अहवालात महिलेचा खून झाल्याचे समोर आले.
दरम्यान, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. शवविच्छेदन अहवालात महिलेचा चोवीस तास आधी मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केली, तेव्हा हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळापासून चारही बाजूला तीन किमी परिसरातील, तसेच महिला वास्तव्यास असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. ९७ टार्गेटेड फुटेज एकत्र करून त्यातील संशयित ३५ वाहने निवडली. त्यातील प्रत्येक वाहनचालकांची कसून चौकशी केली, तेव्हा पोलिसांच्या हाती भारतनगर कात्रज परिसरात वास्तव्यास असलेला रिक्षाचालक केशव चौधरी लागला. त्याने आपल्या रिक्षाच्या हूडमध्ये बदल केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा अधिक संशय त्याच्यावर बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच चौधरीने तोंड उघडले, त्याने पोलिसांना या घटनेबाबत माहिती देताना, महिलेने रिक्षाला हात केला. त्यावेळी अगोदरच माझ्या रिक्षात त्याचे नशेडी मित्र अब्दुल आणि सोनू होते. महिला रिक्षात बसल्यानंतर तिने कात्रज येथील सृष्टी हॉटेल येथे सोडण्यास सांगितले.
मात्र तिघेजण या महिलेला शॉर्टकटचा बहाणा सांगून मधल्या रस्त्याने मांगडेवाडी येथील डोंगरात घेऊन आले. काही वेळाने इतर तिघे आरोपी देखील तिथे आले. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. महिलेसोबत त्यांचा वाद झाला. वादातून आरोपींनी महिलेला अगोदर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर खाणीच्या खोल दरीत ढकलून देऊन ठार मारले. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत खुनाच्या घटनेचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या. यातील सोनू पवार याच्यावर यापूर्वी पुणे ग्रामीण हद्दीत खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर, अब्दुल शेख याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली.
Web Summary : Pune police arrested six individuals for allegedly murdering a 40-year-old woman near Mangadewadi, Katraj. The accused lured her into a remote area, assaulted her, and pushed her into a valley. The investigation revealed a prior murder charge against one suspect, and other crimes against another.
Web Summary : पुणे पुलिस ने मांगडेवाड़ी, कटराज के पास एक 40 वर्षीय महिला की हत्या के आरोप में छह लोगों को गिरफ्तार किया। आरोपियों ने उसे एक सुनसान इलाके में लालच दिया, उस पर हमला किया और उसे एक घाटी में धकेल दिया। जांच में एक संदिग्ध पर पहले भी हत्या का आरोप होने और दूसरे पर अन्य अपराधों का पता चला।