लग्नासाठी घेतलेली कार बनावट कागदपत्रांवर विकली; चिंचवडमध्ये फसवणुकीचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:03 IST2026-02-10T18:02:12+5:302026-02-10T18:03:14+5:30

ओळखीचा फायदा घेत आरोपींनी गाडी तात्पुरती वापरण्यासाठी घेतली. मात्र, नंतर वाहनाचे बनावट कागदपत्र तयार करून ते इतराला विकल्याचे समोर आले.

pimpari-chinchwad crime News fraud by selling a car taken for a wedding to another person | लग्नासाठी घेतलेली कार बनावट कागदपत्रांवर विकली; चिंचवडमध्ये फसवणुकीचा प्रकार

लग्नासाठी घेतलेली कार बनावट कागदपत्रांवर विकली; चिंचवडमध्ये फसवणुकीचा प्रकार

पिंपरी : नातेवाईकाच्या लग्नासाठी काही दिवस वापरासाठी घेतलेली चारचाकी गाडी बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात उघडकीस आला आहे. २० सप्टेंबर २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी ऋषिकेश विठ्ठल महापुरे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ओळखीचा फायदा घेत आरोपींनी गाडी तात्पुरती वापरण्यासाठी घेतली. मात्र, नंतर वाहनाचे बनावट कागदपत्र तयार करून ते इतराला विकल्याचे समोर आले.

पोलिसांनी अविनाश नवनाथ बोराडे (३२, रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी), अमर दामोदर चरवड (३७, रा. एरंडवणे, पुणे), विनोद शंकर पवार (४०, रा. काळेवाडी) आणि भालचंद्र सुखदेव थोरात (३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी भालचंद्र थोरात याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणामुळे वाहन व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा जाणीव झाली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Web Title : शादी के लिए ली गई कार नकली कागजात पर बेची; चिंचवड में धोखाधड़ी

Web Summary : चिंचवड में शादी के लिए उधार ली गई एक कार को जाली दस्तावेजों का उपयोग करके धोखाधड़ी से बेच दिया गया। पुलिस ने एक व्यक्ति को गिरफ्तार किया है और घोटाले में शामिल तीन अन्य की तलाश कर रही है। घटना वाहन दस्तावेजों के सत्यापन के महत्व को दर्शाती है।

Web Title : Car for wedding sold on fake papers; Fraud in Chinchwad

Web Summary : A car borrowed for a wedding was fraudulently sold using forged documents in Chinchwad. Police have arrested one person and are searching for three others involved in the scam. The incident highlights the importance of verifying vehicle documents.