शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री बरोबर फोटो व्हायरल; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:26 IST2022-03-25T18:16:46+5:302022-03-25T18:26:32+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आणि शरद पवार यांचा नातू जय पवार याचे बॉलिवूड अभिनेत्री बरोबर फोटो व्हयरल झाले

शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री बरोबर फोटो व्हायरल; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आणि शरद पवार यांचा नातू जय पवार याचे बॉलिवूड अभिनेत्री बरोबर फोटो व्हायरल झाले आहेत. हि अभिनेत्री म्हणजे नेहमीच फोटोशूटच्या माध्यमातून सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्वशी रौतेला आहे. जय पवार आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
शरद पवार आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या व्यक्ती मानल्या जातात. दोघांच्या राजकीय विधानांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. पण त्यामध्ये राजकीय घडामोडी दिसून येत असतात. पण आता चर्चेत असतात अजित पवार यांचा मुलगा जय पवार बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत उर्वशी आणि जय यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर जय आणि उर्वशीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. हा फोटो नेमका कधीचा आहे? जय आणि उर्वशी या फोटोत एकत्र कसे काय? असे अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हे दोघे केवळ एका शो निमित्ताने एकत्र आले असल्याचं म्हटलं जातंय.