शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

पेठांना मिळणार अडीच एफएसआय

By admin | Updated: February 14, 2015 03:07 IST

महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) जुन्या पेठा, शिवाजी रोड, गावठाण या भागांसाठी ठेवण्यात आलेल्या दीड एफएसआयऐवजी तो अडीच एफएसआय

पुणे : महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) जुन्या पेठा, शिवाजी रोड, गावठाण या भागांसाठी ठेवण्यात आलेल्या दीड एफएसआयऐवजी तो अडीच एफएसआय अशी दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे पेठांमधील रखडलेल्या अनेक बांधकामांना मंजुरी मिळणार असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. या आराखड्यावर आलेल्या ८४ हजार हरकतींवर सुनावणी घेऊन त्याचा अंतिम अहवाल तयार झाला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेमध्ये त्याचा फैसला होणार आहे. या आराखड्यामध्ये जुन्या पेठांसाठी दीडऐवजी अडीच एफएसआयची सुधारणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्वी रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर पुन्हा रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.प्रशासनाकडून सादर केलेल्या विकास आराखड्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेकमुळे अडीचऐवजी दीड एफएसआय ठेवण्यात आला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या चुकीची दुरुस्ती व्हावी याकरिता नगरसेवक संजय बालगुडे यांनी शहर सुधारणा समितीमध्ये ठराव दिला होता. तसेच, त्यांनी जुने वाडामालक, भाडेकरू यांचा मोर्चाही महापालिकेवर काढला होता.विकास आराखडा प्रसिद्ध करण्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी एफएसआय कमी केल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती. विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सध्या अस्तित्वात असलेल्या कडक नियमांमुळे दीड एफएसआयनुसारच परवानगी देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये मध्यवर्ती भागातील अनेक बांधकाम परवानग्या फाईलमध्येच अडकल्या होत्या. नियोजन समितीने ही सुधारणा केल्यामुळे आता या बांधकामांना परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मुख्य सभेची मोहर त्यावर उमटणे आवश्यक आहे.