बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:55 AM2021-07-12T11:55:06+5:302021-07-12T11:57:52+5:30

कुटुंबाबतील बारामतीकर तरुणाच्या पाठीवर चक्क 'साहेब' नावाने शरद पवारांचा चेहरा काढला

Permanent tattoos of Pawar family members on the backs of family members in Baramati; Congratulations from Sharad Pawar himself and Rohit Pawar | बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक

बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक

Next
ठळक मुद्देकुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर अजित पवार, रोहित पवार यांचे टॅटू

बारामती: माझ्या पाठीवर पवार साहेबांचे तर माझे मामा किसन साळुंके यांनी अजितदादा यांचा तर नवनाथ साळुंके यांनी रोहितदादांचा टॅटू पाठीवर काढला आहे.पवार साहेब म्हणजे राजकारणातील ‘किंग’ आहेत. साहेब, अजितदादा, रोहितदादा यांच्यावर माझ्या संपूर्ण कुटुंबाचे निस्मीम प्रेम आहे.  अशी भावना बारामती तालुक्यातील मेडद गावच्या अक्षय साळवे या तरुणाने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

अक्षयच्या पाठीवरील टॅटू पाहून खुद्द शरद पवार यांनी तसेच रोहित पवार यांनी त्याचं कौतुक केलं. प्रेमापोटी अक्षयने आपल्या संपूर्ण पाठीवर शरद पवार यांचा टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू पर्मनंट म्हणजेच कायमस्वरुपी आहे. अक्षय साळवे असं टॅटू पाठीवर काढलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अक्षय याचा मावस भाऊ संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला. अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी आहे. हे सर्व मामा भाचे मेडद या गावी राहतात.

पावसातील सभेने मिळाली प्रेरणा....

विधानसभा निवडणुकांच्या वेळी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत पाऊस आल्यानंतरही शरद पवार यांनी भाषण सुरू ठेवले होते. या भाषणाचा व्हिडीओ प्रचंडगाजला होता.  अनेक जण प्रभावित झाले होते. हे दृश्य पाहून अक्षयचे कुटुंब  भारावून गेले होते.  

शरद पवार यांनी केले कौतुक केले...

हे टॅटू  खुद्द शरद पवार यांनी पाहावे अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. गेली दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवार यांची काल भेट घेतली. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर त्याने शरद पवारांना आपल्या पाठीवर काढेलला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले

Web Title: Permanent tattoos of Pawar family members on the backs of family members in Baramati; Congratulations from Sharad Pawar himself and Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.