"राणेंच्या सत्तेची मस्ती जनताच बरोबर उतरवेल", पुण्यात महाविकास आघाडीकडून टीका करत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:52 IST2021-08-24T19:52:21+5:302021-08-24T19:52:29+5:30
राणेंसह भाजपालाही घोषणांचा अहेर, मंडईत टिळक पुतळ्याजवळ आंदोलन

"राणेंच्या सत्तेची मस्ती जनताच बरोबर उतरवेल", पुण्यात महाविकास आघाडीकडून टीका करत आंदोलन
पुणे : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे नारायण राणे यांना सत्तेची मस्ती आली आहे, जनताच ती बरोबर ऊतरवेल अशी टीका करत महाविकास आघाडीच्या वतीने मंडईत टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे रमेश बागवे, आबा बागूल,शिवसेनेचे संजय मोरे यांच्या नेत्रुत्वाखाली टिळक पुतळ्याजवळ एकत्र येत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राणे तसेच भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
जगताप म्हणाले की राणे यांची जीभ घसरली, त्यांना भाजपाच बळ देत आहे. भाजपालाही याची किंमत चुकवावी लागेल. बागवे यांनी भाजपा ही चुकीची संस्कृती आणत आहे असे सांगितले. मोरे यांनी राणे व त्यांच्या मुलांना जनतेने पराभवाचा धडा शिकवला, पण त्यांना तो समजला नाही अशी टीका करत राणे यांचा निषेध केला.
राणे व भाजपाच्या नावाने वेगवेगळ्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी एकत्र आल्याने मंड ईत गर्दी झाली होती.