शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांचा दबाव; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 15:37 IST

पुण्याची अनेक पोलीस ठाणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या भूमिकेतून काम करत असल्याची टीका

पुणे : पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. शहरातल्या विकासाकामाबाबत आढावा घेण्यासाठी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून दबाव आणण्यात येत आहे. असा गंभीर आरोप केला आहे. पुण्याची अनेक पोलीस ठाणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या भूमिकेतून काम करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. 

पाटील म्हणाले, राज्य सरकार आता सत्तेचा गैरवापर करू लागले आहे. या विरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे. गेल्या २७ महिन्यात या सरकारने एकही न्यायालयीन खटला जिंकलेला नाही. प्रत्येक ठिकाणी सरकारला पराभूत व्हावे लागले. आता महापालिका निवडणूकही जवळ आली आहे. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे काम राष्ट्रवादीकडून पद्धतशीरपणे सुरू आहे. पुणे पोलिसही त्यांना मदत करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या पन्नास वर्षातील कामे हाच या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा राहणार 

पुणे महापालिकेत भाजपचे पाच वर्षांचे काम आणि गेल्या पन्नास वर्षातील कामे हाच या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा राहील. पालिकेने गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने विकासाची मोठी कामे उभी केली आहेत. निश्‍तचतपणे पुणेकर भाजपलाच संधी देतील असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. 

मराठा आरक्षणातही राज्य सरकारला अपयश 

ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या विषयात देखील राज्य सरकारला यश आले नाही. सामान्य मराठा तसेच ओबीसी तरूणांना यामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका