शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘इनरकॉन’ला थकबाकीची नोटीस

By admin | Updated: January 8, 2015 23:05 IST

मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि त्यावरचा दंड असा सुमारे ६ कोटी रुपयांचा महसूल थकविला आहे.

राजगुरुनगर : पवनऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कंपनी ‘इनरकॉन’ने खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पवनचक्कया करताना मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि त्यावरचा दंड असा सुमारे ६ कोटी रुपयांचा महसूल थकविला आहे. तो वसूल करण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयाकडून कंपनीला नोटीस दिली असल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली.खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील २८ गावांच्या हद्दीतील वनविभागाच्या मालकीच्या १९६ हेक्टर इतक्या राखीव वनक्षेत्रात तीस वर्षांच्या भाडे करारावर इनरकॉन कंपनीला पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती. हा प्रकल्प २०१० मध्ये सुरू झाला होता. खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात चाकण वनपरिक्षेत्रातील शिवे, वहागाव, खरपुड, कुडे आदी तेरा गावांच्या हद्दीतील राखीव वनक्षेत्रात पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या गावांच्या हद्दीत पवनचक्कयांची निर्मिती करण्यासाठी कंपनीने डोंगरांमधील मुरूम, दगड, माती यांचे अनधिकृतरीत्या उत्खनन केले होते. वांद्रा, वेल्हावळे, वहागाव या परिसरात शासकीय आकडेवारीनुसार १० हजार ब्रास, तर कुडा परिसरात२५ हजार ब्रास मुरूम दगड-माती यांचे अनधिकृत उत्खनन केले होते. पवनचक्कया करण्यासाठी कंपनीची जड वाहने जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ते करण्यात आले होते. तसेच, डोंगरावर यंत्रसामग्री नेण्यासाठी डोंगर फोडून आणि वृक्षतोड करून रस्ते तयार केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे आणि निसर्गसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. (वार्ताहर)दंडाचा आकडा वाढणारसुमारे पस्तीस हजार ब्रास इतक्या मुरूम, माती व खडकांचे उत्खनन केल्याप्रकरणी हा दंड करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात मात्र इनरकॉन कंपनीने काही लाख ब्रासचे उत्खनन केलेले आहे. त्यामुळे महसूल विभागाने यंत्रांच्या साह्याने झालेल्या उत्खननाची मोजणी केली, तर दंडाचा हा आकडा प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने मोजणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.