शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीने गुदमरला जीव

By admin | Updated: April 17, 2017 06:31 IST

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, नगर रस्त्यावर वाहतूककोंडी कोणत्याही वेळेला होऊ शकते

चंदननगर : पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, नगर रस्त्यावर वाहतूककोंडी कोणत्याही वेळेला होऊ शकते, अगदी रात्री दहानंतरदेखील. हा अनुभव वाहनचालकांनी शनिवारी (दि. १५) घेतला. त्यामुळे नगर रस्त्यावर खराडी-बायपास चौकात नागरिकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री साडेअकरानंतर खराडी-बायपास चौकात प्रचंड कोंडी झाली होती. ही कोंडी सोडवण्यासाठी तब्बल तीन तास गेले. खराडी बायपास चौकातील वाहतूक पोलीस अकरा वाजता जाताच लगेच वाहतूककोंडी होत असते. या ठिकाणी अतिशय बेशिस्त वाहने चालविली जातात. परिणामी कोंडी होते. शनिवारीही रात्री साडेअकरापासून मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत प्रचंड कोंडी झाली. यात बायपासपासून ते टाटा गार्डपर्यंत बीआरटी मार्गासह वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर बायपासपासून खराडी चौकापर्यंत रांगा लागल्या होत्या. बायपासपासून जकातनाक्यापर्यंत प्रचंड रांगा लागल्या होत्या. यात दोन्ही बाजूचे बीआरटी मार्गही जॅम झाले होते. या कोंडीत तीन रुग्णवाहिका अडकल्याने चौकात मोठा गोंधळ झाला होता. चौकात वाहनांना शिस्त लावणे गरजेचे आहे. खासगी वाहनचालकाने रात्रीच्या कोंडीत रुग्णवाहिकेलाही कार आडवी करत अडथळा निर्माण केला. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या चौकातील सततच्या वाहतूककोंडीमुळे परिसरातील नागरिकांनाही प्रचंड त्रास होत आहे. कोंडीमुळे हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांची झोप उडत आहे. या समस्येवर कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे.वाहतूक पोलिसांची वेळ वाढवणे गरजेचे आहे. कारण चौकातील वाहतूक पोलीस जाताच कोंडी होत आहे. तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिग्नलच्या बॅटऱ्या खराब झाल्या असून त्या बदलणे गरजेचे आहे. त्याऐवजी सिग्नल हे विजेवर चालविल्यास वाहतूक नियमांचे पालन काही प्रमाणात होईल. चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे कोंडी होत आहे. (वार्ताहर)