गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा

By भाग्यश्री गिलडा | Published: April 10, 2024 08:05 PM2024-04-10T20:05:09+5:302024-04-10T20:06:11+5:30

ज्येष्ठाला एमएनजीएलचे बिल भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले होते

pay the gas bill; The elder was cheated, as many as seven and a half lakhs were cheated | गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा

गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा

पुणे: एमएनजीएल गॅसचे बिल भरण्याचे बाकी आहे. ते तत्काळ भरा, असे सांगून सायबर चोरट्यांनी कोथरूड परिसरात राहणाऱ्या वृद्धाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सायबर चोरट्याने कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल साडेसात लाखांचा गंडा घातला आहे.

अधिक माहितीनुसार, वामन रामचंद्र सातपुते (वय- ८२, रा. रामबाग कॉलनी) यांनी मंगळवारी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ एप्रिल रोजी घडला आहे. तक्रारदार यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. एमएनजीएलकडून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे मागील महिन्याचे एमएनजीएलचे बिल भरलेले नाही, ते तत्काळ भरा असे सांगितले. त्यांनतर ते भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. अप्लिकेशनचा वापर करून रिमोट ॲक्सेस मिळवला. खासगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यातून परस्पर ७ लाख ६७ हजार रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब दिला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कदम हे करत आहेत.

Web Title: pay the gas bill; The elder was cheated, as many as seven and a half lakhs were cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.