शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

कात्रज चौकात विनाचालक पीएमटीचा थरार ; तरुणाच्या धाडसामुळे वाचले शेकडो प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:12 PM

पीएमपीएल वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे आज सकाळी साडे सातच्या सुमारास “विनाचालक पीएमटीचा थरार” हजारो कात्रजकरांनी अनुभवला. ही घटना इतकी भयानक होती की सांगणाऱ्यांचाही थरथर काप होत होता. 

ठळक मुद्देदिगंबर कोरळेच्या एका कृतीमुळे रोखले गेले मृत्यूचे तांडव 

अभिजीत डुंगरवाल 

पुणे : पीएमपीएल वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे आज सकाळी साडे सातच्या सुमारास “विनाचालक पीएमटीचा थरार” हजारो कात्रजकरांनी अनुभवला.या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून,मात्र दोन रिक्षा चालक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. ही घटना इतकी भयानक होती की सांगणाऱ्यांचाही थरथर काप होत होता.  या विषयी अधिकमाहिती अशी की, सकाळी साडे सातची वेळ नेहमीप्रमाणे कात्रज चौकात विद्यार्थी,भाजीवाले,नोकरदार यांची मोठी वर्दळ होती. कात्रज पीएमटी डेपोतून ट्रँव्हल टाईम या ठेकेदार कंपनीची बस क्रमांक आर २८३, एम एच १४ सी डब्लू,१७४४ ही बस कात्रज ते हौसीग बोर्ड या मार्गाने जाण्यासाठी स्वारगेटच्या दिशेने तोंड करून उतारावर लावण्यात आली होती. या बसचा चालक पिराजी दिवटे हा वाहकाला बोलवण्यासाठी गाडी मोकळी सोडुन खाली उतरला. सुदैवाने कोणीही प्रवासी बसमध्ये बसलेले नव्हते. ही बस ब्रेक न लागल्यामुळे दत्तनगरकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या बाळासाहेब महारनवर यांच्या  रिक्षा क्रमांक एम एच १२ क्यू ई ७८३७ व जावेद बेडगे यांच्या रिक्षा क्रमांक एम एच १२ क्यू ई ७९४० वर जाऊन आदळली यात हे दोघेही जखमी झाले आहेत.व त्यांच्या रिक्षाचेही नुकसान झाले आहे. पुढे ही बस या रिक्षांना  धडकून कात्रज मुख्य चौकाकडे जाऊ लागली,प्रचंड आरडाओरडा होत असल्याने नागरीकांनी आपले जीव वाचवत तेथून पळ काढला,अनेक रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षा या बसच्या मार्गातून हटवल्या.बाजूलाच चहा पित असलेल्या दिगंबर कोराळे (रा.अय्यपा मंदीर जवळ,कात्रज) या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या जीवाची पर्वा  न करता पाठीमागच्या दारातून धावत्या पीएमटीमध्ये प्रवेश केला. तोपर्यत उतार असल्यामुळे पीएमटी मुंबई बायपास चौकापर्यंत पोहचली होती. पुढे ती सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना आदळणार तो पर्यत या युवकाने ब्रेक दाबून गाडी थांबवली.              या युवकाच्या साहसामुळे अनेकांचे प्राण वाचले मात्र,ज्या ठेकेदाराची ही नादुरुस्त पीएमटी आहे व जो चालक या घटनेला जबाबदार आहे, त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे औस्तुक्याचे आहे. 

टॅग्स :katrajकात्रजAccidentअपघातPMPMLपीएमपीएमएल