शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:26 IST

पुस्तक वाचन, हस्तकला, संगीत, नृत्य, योगा, शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग यांसारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे

उजमा शेख

पुणे : उन्हाळा सुरू झाला की, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं; पण त्याच वेळी पालकांच्या मनात अनेक योजना आकार घेतात. आजची पालक मंडळी केवळ सुट्टीचा अर्थ मजा-मस्ती असा न ठेवता, त्याचा उपयोग विकासासाठी कसा करता येईल यावर भर देताना दिसतात. आजच्या डिजिटल युगात मुलांचा जास्त वेळ मोबाइल, गेम्स आणि सोशल मीडिया यामध्ये जातो. त्यामुळे अनेक पालक आता ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय स्वीकारत आहेत.

‘डिजिटल डिटॉक्स’मध्ये पुस्तक वाचन, हस्तकला, बागकाम, भांड्यांची सजावट, कथा-कविता लेखन, मुलांना कला, संगीत, नृत्य, योगा, शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग, कम्प्युटर कोर्स, रोबोटिक्स, कोडिंग यांसारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे. पुण्यातील अनेक संस्थांनीही यंदा विशेष उन्हाळी कार्यशाळा, वाचन शिबिरे, संवाद शिबिरे आणि विज्ञान प्रयोगशाळा आयोजित केल्या आहेत. या माध्यमातून मुले केवळ शिक्षणाशी जोडली जातातच; पण त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संघभावनाही वाढते. अनेक संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना स्वतंत्रपणे राहणं, गटात काम करणं, वेळेचं नियोजन करणं, समस्या सोडवणे अशा गोष्टी शिकवल्या जात आहेत.

सुट्टीत मुलांना काहीतरी नवीन शिकावं असं वाटतं. म्हणूनच आम्ही आमच्या मुलाला विज्ञान शिबिरात घातलं आहे. तिथं तो प्रयोग शिकतो, निरीक्षण करतो, आणि खूप उत्साहाने अनुभव सांगतो. - मोनिका ओंबळे (पालक)

मोबाइल आणि सोशल मीडियापेक्षा मुलांच्या मनात कल्पनाशक्ती, कुतूहल आणि सर्जनशीलतेचं बीज पेरणं हीच सुट्टीची खरी शिदोरी असते. त्यामुळे ‘डिजिटल डिटॉक्स’मुळे मुले त्यांच्या बालपणाशी पुन्हा जोडले जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही नोकरी करत असल्यामुळे मुलांना वेळ देता येत नाही; पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही एकत्र छोटी ट्रिप प्लॅन करतो.-  अवधूत सूर्यवंशी (पालक)

टॅग्स :PuneपुणेSwimmingपोहणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा