गलांडवाडीत मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने घबराट; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:39 IST2025-05-15T12:38:55+5:302025-05-15T12:39:50+5:30

शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले त्यांचे पुतणे प्रवीण देडगे यांना हे पिल्लू मृत अवस्थेत आढळले.

Panic as dead leopard cub found in Galandwadi; Fear among farmers | गलांडवाडीत मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने घबराट; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

गलांडवाडीत मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने घबराट; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

केडगाव - दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे आज सकाळी ७ वाजता एका शेतात मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी विजय देडगे यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले त्यांचे पुतणे प्रवीण देडगे यांना हे पिल्लू मृत अवस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ शेजारील शेतकरी अनिल राजगुरू, राजू थोरात, संजय खैरे यांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच रमेश पासलकर यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनरक्षक वीरेंद्र लंकेश्वर, वनपाल अंकुश खरात आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर राहुल काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सुरुवातीचा अंदाज व्यक्त केला की, परिसरात पाण्याची टंचाई आणि ऊसतोड झाल्याने लपण्यासाठी जागा उरलेली नाही. भक्षाच्या शोधात बिबट्यांमध्ये झटापट होऊन किंवा विषारी भक्षामुळे पिल्लाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.

शेतात तारेचे कुंपण असूनही बिबट्याचे पिल्लू आणि त्याची मादी आत कशी आली, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Panic as dead leopard cub found in Galandwadi; Fear among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.