यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:56 AM2022-07-01T10:56:01+5:302022-07-01T11:08:57+5:30

भाविकांना एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन...

Pandharpurs ashadhi Wari to make st bus this year Arrangement of Ashadi special bus by ST department | यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

googlenewsNext

पुणे :आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. यावर्षी १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून, यानिमित्त पुणे एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे विभागासह इतर विभागांच्या मदतीने ५५० बसची सोय केली आहे. ८ जुलै ते १४ जुलै दरम्यान ही विशेष सेवा एसटीतर्फे देण्यात येणार आहे. तरी भाविकांनी एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, खासगी वाहतुकीचा प्रवास टाळावा, असे आवाहन एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

ग्रुप बुकिंगची व्यवस्था..

आषाढीनिमित्त अथवा इतरत्र कुठेही जाण्यासाठी एसटी विभागातर्फे ग्रुप बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ४४ जणांचे ग्रुप बुकिंग करून स्वतंत्र बस त्यासाठी उपलब्ध होईल. प्रत्येकाच्या घरापासून इच्छित स्थळापर्यंत ही सेवा असणार आहे. (किमान २० ते २५ जण एका ठिकाणाहून अपेक्षित) हिरकणी, शिवशाही यासह लालपरी ग्रुप बुकिंगसाठी बुक करता येणार आहे. तसेच बसच्या नियमित तिकिटाएवढेच पैसे यासाठी लागणार असल्याने नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आगारनिहाय बस...

१) शिवाजीनगर - २०

२) स्वारगेट - २६

३) बारामती - २६

४) बारामती एमआयडीसी - ११

५) भोर - १६

६) नारायणगांव- २०

७) शिरूर - २०

८) राजगुरूनगर - २३

९) तळेगाव - १५

१०) इंदापूर - २६

११) सासवड - २०

१२) दौंड - १२

१३) पिंपरी-चिंचवड - १५

एकूण - २५० (या व्यतिरिक्त ३०० बसची सोय)

सेवेचा लाभ घ्यावा..

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ५५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त ग्रुप बुकिंगदेखील प्रवाशांना करता येणार आहे. या सेवेचा देखील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. ग्रुप बुकिंगच्या वेळी परत येण्यासाठी देखील बुकिंग करता येणार आहे.

- पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, स्वारगेट बस स्थानक

 

Web Title: Pandharpurs ashadhi Wari to make st bus this year Arrangement of Ashadi special bus by ST department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.