"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:33 PM2024-05-23T19:33:16+5:302024-05-23T19:42:55+5:30

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जयपूरचं एक कपल जखमी झालं आहे. या घटनेत जखमी झालेली महिला फरहा गुरुवारी जयपूरला पोहोचली.

jaipur lady farha who was shot by terrorists in jammu kashmir anantanag tells about incident | "पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!

"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!

काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जयपूरचं एक कपल जखमी झालं आहे. या घटनेत जखमी झालेली महिला फरहा गुरुवारी जयपूरला पोहोचली. जयपूरला पोहोचल्यावर, फरहाला उपचारासाठी एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे तिचे सीटी स्कॅन देखील करण्यात आलं. या घटनेत फरहाचा पती तबरेजही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चेन्नईला रेफर करण्यात आलं आहे.

फरहा तो भयंकर प्रसंग कधीच विसरू शकत नाही. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना फरहाने दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या आणि गोळीबाराच्या घटनेचे वर्णन केलं. दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी करत तिने आपल्या पतीच्या उपचारासाठी पंतप्रधानांकडे मदत मागितली.

18 मे रोजी काश्मीरमधील अनंतनाग येथे गेलेल्या राजस्थानमधील कपलवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये पती-पत्नी गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले, त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता महिलेने मीडियासमोर येऊन घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

फरहा म्हणाली, "मी आणि माझे पती 13 मे रोजी काश्मीरला फिरायला गेलो होतो. मी माझ्या पतीला सांगत होते की, काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेवर सगळेच प्रश्न उपस्थित करतात, पण इथे सर्व काही सामान्य शहरांसारखे आहे. आमचे नातेवाईकही या ट्रिपवर आमच्यासोबत फिरण्यासाठी आले होते. 18 मे रोजी आम्ही सर्व आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. मी आणि माझे पती सर्वात मागे होतो. तेव्हाच गोळीबार झाला आणि माझ्या पतीला गोळी लागली, नंतर मला गोळी लागली."

"गोळीबाराच्या वेळी माझा मुलगा घाबरून खुर्चीच्या मागे जाऊन लपल्याचं मी पाहिलं. मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी धावले तेव्हा मला गोळी लागली. यावेळी मी माझ्या पतीला पाहिलं असता त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त येत होतं. माझ्या खांद्यावरून रक्त वाहत होतं. आम्ही दोघंही ओरडत होतो आणि रडत होतो. यानंतर आमचे नातेवाईक हॉटेलमधून बाहेर आले आणि आम्हाला रुग्णालयात घेऊन गेले. आमची खूप काळजी घेतली गेली. माझ्या पतीची पाच तास डोळ्यांची आणि नाकाची शस्त्रक्रिया केली."

"माझ्या पतीचे दोन्ही डोळे खराब झाले असून त्यांना काहीच दिसत नाही. माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. काश्मीरहून जयपूरला आलो. माझ्या पतीला डोळ्यांच्या उपचारासाठी चेन्नईला रेफर करण्यात आले आहे. मला पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की, तुम्ही लोकांनी आम्हाला खूप मदत केली आहे, आता माझ्या पतीसाठी डोळे डोनेट करा. माझ्या पतीला किमान एक डोळा तरी डोनेट करा" असं फरहाने म्हटलं आहे. 
 

Web Title: jaipur lady farha who was shot by terrorists in jammu kashmir anantanag tells about incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.