शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

पादुकांचे दर्शन; धन्य झाले मन

By admin | Updated: June 22, 2014 23:48 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुणेकर सुखावले. रविवारची सुटी असल्याने पालख्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी जनसागर लोटला.

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुणेकर सुखावले. रविवारची सुटी असल्याने पालख्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी जनसागर लोटला. ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’चा एकच आवाज सर्वत्र दुमदुमत होता. शहरात विविध ठिकाणी पुणेकरांनी वारकऱ्यांच्या सेवेकरिता विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पहाटेपासूनच पुणेकरांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या बाहेर एक किलोमीटरपर्यंत महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा होत्या. पोलिसांनी ठिकठिकाणी मदत केंद्र आणि बंदोबस्त ठेवल्याने वाहतूक सुरळीत चालू होती. माऊलींचे दर्शन घेऊन कृतकृत्य झाल्याचे भाव प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये होती. तुकोबारायांच्या नावाचा गजर करीत भाविकांनी फुलांनी सजविलेल्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. मंदिराबाहेर सीसीटीव्हीची पाहणी करीत पोलीस कोणतीही विपरीत घटना घडू नये, याकरिता सतर्क होते. राहुट्यांमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात अभंगाचे सूर ऐकू येत होते. (प्रतिनिधी)