रांजणगाव सांडस येथे साठ एकराच्या वर ऊस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:27 PM2022-11-21T17:27:21+5:302022-11-21T17:27:36+5:30

आगीने उसाची रांगोळी केल्याने शेतकऱ्यांच्याही स्वप्नांचे जळीत झाले

Over sixty acres of sugarcane was burnt at Ranjangaon Sandus | रांजणगाव सांडस येथे साठ एकराच्या वर ऊस जळून खाक

रांजणगाव सांडस येथे साठ एकराच्या वर ऊस जळून खाक

googlenewsNext

रांजणगाव सांडस : टोकर वाट, बुवांचा चा मळा या परिसरातील भीमा नदी काठावरील शेतकरी वर्गाचा साठ एकराच्या वर ऊस जळून खाक झालेला आहे. विशेष म्हणजे हा ऊस तोडणी योग्य झालेला असून तोडणीसाठी शेतकरी वर्ग वाट पाहत होते. ऊस शेत एकमेकांच्या शेजारी शेतकऱ्यांचे ऊस असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले व परिसरातील अडसाली ऊस ,खोडवा ऊस, लागण ऊस पूर्णपणे आगीत जळून खाक झाला आहे. या आगीत शेतकरी वर्गांचे पाईपलाईन चे मोठे नुकसान झाले आहे. 

अनेक ठिकाणी पाणी काढण्यासाठी ठेवलेले वॉल पूर्णपणे जळून गेले आहेत. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. कारण या भागात विजेचे बाहेर नियमन असल्यामुळे वीज उपलब्ध नव्हती. कोणत्या कारणामुळे आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऊसाला लागलेली आग प्रचंड प्रमाणात आगेच्या ज्वाला उसातून दुसऱ्या शेतकऱ्याच्या उसात पसरत होत्या. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु शेतकरी वर्गाचा हाता तोंडाशी आलेला घास या आगीने जळून खाक केलेला आहे. शेतकरी वर्गाने ऊस पेटू नये. म्हणून ट्रॅक्टरच्या साह्याने आगीपासून दूर अंतरावर उसाच्या शेतात ट्रॅक्टर घालून रोटर वेटरच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांची रोजी रोटी ऊस पिकावरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या घरात कोणाचे लग्न ,कर्ज फेडणे, नवीन संसारासाठी काहीतरी करणे अशी स्वप्न अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या ऊस पिकावर ती रंगवलेली होती. परंतु आगीने उसाची रांगोळी केल्याने शेतकऱ्यांच्याही स्वप्नांचे जळीत झाले आहे.

Web Title: Over sixty acres of sugarcane was burnt at Ranjangaon Sandus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.