नवनियुक्त ७ विश्वस्तांपैकी ३ जेजुरीचे रहिवासी; मार्तंड देवसंस्थाच्या नवनियुक्त विश्वस्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 03:37 PM2023-06-07T15:37:06+5:302023-06-07T15:44:59+5:30

धमार्दाय आयुक्त पुणे विभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या सात विश्वस्तांची निवड घटनेनुसार करण्यात असून कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही

Out of the 7 newly appointed trustees, 3 are residents of Jejuri; The claim of the newly appointed trustees of Martand Devasstha | नवनियुक्त ७ विश्वस्तांपैकी ३ जेजुरीचे रहिवासी; मार्तंड देवसंस्थाच्या नवनियुक्त विश्वस्तांचा दावा

नवनियुक्त ७ विश्वस्तांपैकी ३ जेजुरीचे रहिवासी; मार्तंड देवसंस्थाच्या नवनियुक्त विश्वस्तांचा दावा

googlenewsNext

पुणे : श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त निवडीवरून सध्या वाद सुरू असून या पार्श्वभूमीवर, धमार्दाय आयुक्त पुणे विभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या सात विश्वस्तांची निवड घटनेनुसार करण्यात आली आहे. यापैकी कोणीही राजकीय पक्षाशी निगडित नसून सातपैकी तीन जण हे जेजुरीचे रहिवासी असल्याचा दावा मार्तंड देवसंस्थाच्या नवनियुक्त विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी देवसंस्थानचे अध्यक्ष पोपटराव खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, अभिजित देवकाते, ॲड. पांडुरंग थोरवे, अनिल सौंदडे आदी उपस्थित होते.

अध्यक्ष पोपटराव खोमणे म्हणाले, घटनेनुसारच सर्व निवडी झाल्या आहेत. जेजुरी जे सुरू आहे ते चुकीचे आहे. या नियुक्तीमुळे सेवेकरी, खांदेकरी, पुजारी, गुरव इत्यादी कोणाच्याही दैनंदिन कामकाजात बाधा येत नाही. मंदिराचे व्यवस्थापन, भाविकांच्या पायाभूत सोयी- सुविधा यासंदर्भात नवे विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे. सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या क्षेत्राबद्दल विनाकारण चुकीचा संदेश समाजात पसरत आहे. भाविकांसाठी सोयी- सुविधा करण्याचा मानस नवीन विश्वस्तांचा आहे. ज्यामध्ये सुसज्ज हॉस्पिटल, नवीन अद्ययावत भक्त निवास, वृक्षारोपण, दर्शन सभा मंडप, प्रशस्त अन्नछत्र आधी अनेक गोष्टींचा समावेश आहे. मल्हार गडाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे.

ॲड. पांडुरंग थोरवे म्हणाले, कोणत्याही विश्वस्ताला न्यायालयाने आजपर्यंत दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली नाही. तसेच सदर नियुक्तीच्या वेळी कोणत्याही शिफारस पत्राचा वापर करण्यात आलेला नाही. किंबहुना माननीय सह धर्मादाय आयुक्त यांनी कोणाचाही दबावाला बळी पडून किंवा शिफारस पत्राच्या आधारे सदर नियुक्त्या केल्या नाहीत, हे निकालातून स्पष्ट आहे. आंदोलनातील काही व्यक्ती खोटी माहिती पसरवत आहेत. त्याचप्रमाणे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी विश्वस्त हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच हिंदू धर्मातील, त्याचप्रमाणे पुरुष किंवा स्त्री असावा एवढेच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थानिकत्वाचा कोणताही मुद्दा नाही. सन २०१२ च्या घटना दुरुस्तीमध्ये पुणे किंवा सासवड बार असोसिएशनचा एखादा पदाधिकारी विश्वस्त म्हणून असावा, असे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे यानुसार धर्मादाय आयुक्त यांनी सर्व विश्वस्त नेमलेले आहेत.

गेल्या विश्वस्तांमध्ये चार लोक पुण्यातील नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडित असल्याचा आरोप चुकीचा असून या निवडीमध्ये सर्वसमावेशक व उच्चविद्याविभूषित लोकांना पसंती देण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक, बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. विश्वस्तांपैकी अध्यक्ष पोपटराव खोमणे, मंगेश घोणे व डॉ. राजेंद्र खेडेकर हे मूळ जेजुरी गावचे रहिवासी आहेत. ॲड. विश्वास पानसे व अभिजित देवकाते हे जेजुरी पंचक्रोशीतील निवासी आहेत. ॲड. पांडुरंग थोरवे बारामती हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व अनिल सौंदडे हे उद्योगपती व उत्तम व्यवस्थापन करणारे व्यक्तिमत्त्व आहे. गेल्यावेळी जे विश्वस्त होते त्यामध्ये चार जण हे भोसरी, वडगाव शेरी, पुणे येथील असल्याचे डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले.

Web Title: Out of the 7 newly appointed trustees, 3 are residents of Jejuri; The claim of the newly appointed trustees of Martand Devasstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.