शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 12:50 IST

सामान्य लोकांचे राज्य जर कुणी आणू शकत असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे

लोहगाव (पुणे) : ‘गेल्या साडेसात वर्षांत वडगाव शेरीसह राज्याचा विकास थांबला आहे. राज्यातील तब्बल १५ लाख युवा दरवर्षी नोकरी शोधत असतात. सरकारमधील लोक इथल्या नोकऱ्या गुजरातला नेत असतील, तर आपण गप्प बसायचं का? सामान्य लोकांचे राज्य जर कुणी आणू शकत असेल तर त्याचं नाव शरद पवार (Sharad Pawar) आहे,’ असे प्रतिपादन आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.

वडगावशेरी  (Vadgaon Sheri) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ लाेहगाव येथे शनिवारी (दि.९) आमदार राेहित पवार यांच्या उपस्थितीत जनविकास सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी महायुतीतील नेत्यांसह आतापर्यंतच्या राज्यकारभारावर घणाघाती हल्ला चढवला. 

पवार म्हणाले, ‘गेल्या ७ महिन्यांमध्ये २६५ बलात्काराच्या घटना घडल्या, ४५० विनयभंगाचे गुन्हे गेल्या ७ महिन्यांमध्ये दाखल झालेले आहेत. म्हणजे आज माता भगिनी सुरक्षित नाहीत. मग इथे असलेले लोकप्रतिनिधी रात्रीच्या वेळेस जास्त काम करतात हे कुठंतरी दिसतंय. खास मित्रांना मदत करण्याची भूमिका त्यांनी बजावलीय, असेही त्यांनी सांगितले.  २००९ ते २०१४ बापूसाहेब आमदार असताना १४०० कोटींची कामे मंजूर करून आणली. त्याची आजची किंमत ५ हजार कोटींच्या वर जाते.

सध्या घड्याळ पडलंय बंद रात्रीस खेळ चाले, असं काहीसं भाजपचं झालंय. हे सरकार “जाऊद्या” सरकार आहे. रिंगरोडच्या कामात यांनी २६ हजार कोटींची दलाली खाल्ली. सध्या घड्याळ बंद पडलेलं आहे, लोकशाहीच्या माध्यमातून पुढच्या उमेदवाराचे बारा वाजवायचे, असा घणाघात त्यांनी सभास्थळी केला.

संत तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी ठासून सांगतो, येत्या अडीच वर्षांत लोहगावचा विकास करण्याचे काम पार पाडणार. महाराष्ट्राची निवडणूक चुरशीची असली तरी माझा विजय निश्चित आहे. - बापू पठारे, उमेदवार, महाविकास आघाडी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rohit Pawarरोहित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीvadgaon-sheri-acवडगाव शेरी