सामान्य नागरिकांना चार-पाच महिन्यांत मिळणार लस :राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:08+5:302021-02-05T05:02:08+5:30

पुण्यात एका पुरस्कार कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, ''अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यानी आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थाकडे ...

Ordinary citizens will get vaccine in four-five months: Rajesh Tope | सामान्य नागरिकांना चार-पाच महिन्यांत मिळणार लस :राजेश टोपे

सामान्य नागरिकांना चार-पाच महिन्यांत मिळणार लस :राजेश टोपे

पुण्यात एका पुरस्कार कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, ''अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यानी आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थाकडे लसीकरणासाठी नोंदणी करावी. लसीकरणाबाबत आत्मविश्वास वाढत आहे, ही चांगली बाब आहे. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे ३० कोटी लोकांना त्वरेने लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल.''

''संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी मोठी रुग्णालये निर्माण केली पाहिजेत, ही शिकवण कोरोनाने आपल्याला दिली. मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केल्याप्रमाणे मुंबई आणि पुण्याच्या मध्ये संसर्गजन्य आजारांचे पहिले मोठे रुग्णालय उभारले जाईल. त्या धर्तीवर राज्यात इतरत्र रुग्णालये निर्माण केली जातील'', असेही टोपे यांनी संगितले.

----

याचा अर्थ कुठे तरी चुकते आहे...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रती आदर आहे. राज्य व देशासाठी त्यांनी चांगले काम केले आहे. जलसंधारण आणि इतर काम चांगली कामे केली आहेत. मात्र कृषी कायद्यांच्या विरोधात ते आंदोलन करत आहेत. याचा अर्थ केंद्र सरकार कुठे तरी चुकत आहे. म्हणून आंदोलनाला महत्त्व आहे. मनधरणी केली जात आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.

Web Title: Ordinary citizens will get vaccine in four-five months: Rajesh Tope