पुण्यात शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार आदेश काढणार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 20:10 IST2020-12-21T20:10:15+5:302020-12-21T20:10:19+5:30

राज्य शासनाने मंगळवारपासून रात्री संचारबंदीची घोषणा केली आहे.

The order will be issued in Pune as per the official notification of the government; Appeal not to believe the rumors | पुण्यात शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार आदेश काढणार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुण्यात शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार आदेश काढणार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुणे : मंगळवारपासून (दि. २२) रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत शासनाच्या अधिकृत अधिसूचनेची वाट पहात आहोत. त्यातील सूचनांना अनुसरुन मंगळवारी सकाळी आदेश काढण्यात येतील. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचना गृहीत धरावी, असे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

राज्य शासनाने मंगळवारपासून रात्री संचारबंदीची घोषणा केली आहे. याबाबत डॉ. शिसवे यांनी सांगितले की, शासनाची अधिकृत अधिसूचना अद्याप मिळाली नाही. संचारबंदीसंदर्भात आज पोलीस आणि महापालिका आयुक्त यांच्यात बैठक झाली. त्यात पुण्याविषयी नेमक्या काय सूचना आहेत, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. उद्या सकाळी शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर त्याबाबतचे आदेश महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून काढण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

Web Title: The order will be issued in Pune as per the official notification of the government; Appeal not to believe the rumors