शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अकलूजच्या २ संस्थावर फौजदारी गुन्ह्याचे आदेश

By admin | Updated: March 28, 2017 03:31 IST

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कातील अनियमिततांप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोन कॉलेजविरुद्ध

मुंबई : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कातील अनियमिततांप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोन कॉलेजविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपयांची वसुली करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. त्यातील धन्वंतरी कॉलेज आॅफ नर्सिंगकडून ७८ लाख ९२ हजार २९९ रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. तर, सहारा इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग एज्यूकेशन या कॉलेजकडून १ कोटी ९० लाख ३ हजार ६६४ रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपात शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा ठपका या दोन्ही संस्थांवर चौकशीअंती ठेवण्यात आला आहे. राज्यातील शिष्यवृती घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक नेमले होते. या पथकाच्या निर्देशांनुसार सामाजिक न्याय विभागाच्या लातूर येथील प्रादेशिक उपायुुक्तांनी अकलूजमधील दोन्ही कॉलेजचा लेखा परीक्षण अहवाल सादर केला होता. २००८ ते २०१३-१४ या काळातील हे लेखापरीक्षण होते. या संस्था फौजदारी गुन्हे दाखल पात्र असल्याचा अभिप्राय विशेष चौकशी पथकाने दिला होता. केवळ अकलूजमधीलच नव्हे तर राज्यातील जवळपास तीसहून अधिक संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करून अनियमिततांची रक्कम वसूल करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने गेल्या महिनाभरात दिले आहेत. त्याचे वृत्त लोकमतने दिले होते. (विशेष प्रतिनिधी) सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आणि घोटाळ्यातील रक्कम वसुलीचे आदेश दिलेले आहेत. त्या नुसार एकेका संस्थेविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश माझ्या कार्यायलायने संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयांना दिलेले आहेत. त्या बाबत कार्यवाहीचा अहवाल मी मागविला आहे.- पीयूष सिंह, आयुक्त, समाज कल्याण; पुणे.