धरणाच्या जलवाहिनीला विरोध केल्याने मारहाण
By Admin | Updated: November 12, 2014 23:07 IST2014-11-12T23:07:16+5:302014-11-12T23:07:16+5:30
भामा आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविल्याशिवाय या धरणातून पुणो शहराला पाणी देण्यास विरोध करणा:या शेतक:यांनी सावरदरी (ता. खेड) येथे जलवाहिनीचे काम बंद पाडले.

धरणाच्या जलवाहिनीला विरोध केल्याने मारहाण
आंबेठाण : भामा आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविल्याशिवाय या धरणातून पुणो शहराला पाणी देण्यास विरोध करणा:या शेतक:यांनी सावरदरी (ता. खेड) येथे जलवाहिनीचे काम बंद पाडले. जलवाहिनीचे काम करणा:या कामगारांना मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास लिंभोरे, स्वप्निल देखमुख व अन्य अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी जलवाहिनीचे काम करणारे अभियंता जितेंद्र अशोक बडगुजर (वय 28, रा. आयफील सिटी, चाकण) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पुण्याची पाण्याची गरज लक्षात घेऊन भामा आसखेड धरणातील 2.6क् टीएमसी पाणी पुणो शहराला देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून निधीही मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी प्रथम भूसंपादनाच्या व आता जलवाहिनी टाकण्याच्या कामाने गती घेतली आहे. परंतु, जलवाहिनीच्या कामाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला आहे. भामा आसखेड धरणामुळे सुमारे दीड हजार शेतकरी विस्थापित झाले आहेत. पुणो शहराला पाणी देण्यास या भागातील शेतक:यांचा विरोध नाही. परंतु, आधी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करूनच पाणी नेण्यात यावे, अशी या भागातील शेतक:यांची आहे. विरोधाची नव्हे, तर सामंजस्याची भूमिका असल्याचे प्रकल्पग्रस्त सांगतात. मात्न, त्यांच्या मागण्यांना शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. या भागात अनेक ठिकाणी पोलीस संरक्षणात हे काम करण्यात येत आहे. या जलवाहिनीविरोधात यापूर्वी पुणो जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपाचे नेते शरद बुट्टे-पाटील आणि युवक कॉंग्रेसचे अमोल पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतक:यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. तेव्हापासून या आंदोलनाची धग दिवसेंदिवस
वाढत आहे. (वार्ताहर)
या जलवाहिनीसाठी काम करणारे ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी यांनी शेतक:यांना विश्वासात घेऊन काम करावे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करावा. जर शेतक:यांना विश्वासात घेऊन काम केले नाही, तर आंदोलन तीव्र केले जाईल. तसेच, शेतक:यांनीही आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडाव्यात. कायदा हातात घेऊ नये.
- शरद बुट्टे-पाटील