Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 07:57 IST2025-06-17T07:55:16+5:302025-06-17T07:57:26+5:30

Plane Crash boeing dreamliner emergency landing: एअर इंडियाच्या अहमदाबादमधील अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Air India Plane Crash after Ahmedabad 4 more boing dreamliner flights make emergency landing | Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Plane Crash boeing dreamliner emergency landing: अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी एअर इंडिया कंपनीचे प्रवासी वाहतूक करणारे विमान टेक ऑफ नंतर लगेचच कोसळले. लंडनला जाणारे हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले. त्यामुळे सुमारे २६५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बोईंग विमानांबद्दल चिंता सतत वाढत आहे. अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर गेल्या काही दिवसांत तांत्रिक बिघाड आणि सुरक्षेच्या कारणास्तव बोईंग विमानांना इमर्जन्सी लँडिंग म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत विमान जमिनीवर उतरवण्याची कसरत करावी लागली आहे.

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये मोठा हवाई अपघात झाला. त्यात फक्त एक प्रवासी वाचला. या घटनेमुळे बोईंग विमानांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अहमदाबाद घटनेनंतरही अनेक उड्डाणांमध्ये त्रुटी आढळून आल्या. अशा परिस्थितीत, या अपघातानंतरही कोणत्या विमानांमध्ये त्रुटी होत्या आणि त्यांचे इमर्जन्सी लँडिंग का करावे, समजून घेऊया.

हाँगकाँग-दिल्ली विमानाचे लँडिंग

१३ जून रोजी हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान AI315 तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणादरम्यान मध्ये उतरवावे लागले. हे विमान देखील बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर होते. अहमदाबाद अपघातानंतर लगेचच ही घटना उघडकीस आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आणखी वाढले.

लंडन, फ्रँकफर्टहून दोन ड्रीमलाइनर्स परतले

१३ जूनलाच लंडनहून चेन्नईला येणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान BA35 फ्लॅप फेल्युअरमुळे टेकऑफनंतर अवघ्या दोन तासांतच हीथ्रो विमानतळावर उतरवण्यात आले. तर फ्रँकफर्टहून हैदराबादला येणारे लुफ्थांसाचे विमान LH752 बॉम्बच्या धमकीमुळे जर्मनीला परत पाठवावे लागले. ही दोन्ही विमाने देखील बोईंग ड्रीमलाइनर विमाने होती.

हैदराबाद विमानतळावर बॉम्बची धमकी

१५ जूनला संध्याकाळी हैदराबाद विमानतळाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ईमेल आला. त्यानंतर लुफ्थांसाच्या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, विमान फ्रँकफर्टला परत पाठवण्यात आले. सुरक्षा मानके लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

लखनौमध्ये लँडिंग दरम्यान ठिणगी

रविवारी सकाळी लखनौ विमानतळावर उतरताना सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या SV3112 या विमानातून ठिणग्या आणि धूर निघू लागला. विमानात हज यात्रेकरू होते. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने विमान थांबवले आणि अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. या अपघाताचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले.

दरम्यान, सततच्या घटनांनंतर प्रवाशांमध्ये बोईंग विमानांबद्दल अस्वस्थता दिसून येत आहे. त्याच वेळी, विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की प्रवाशांची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे आणि सर्व घटनांमध्ये SOP अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. असे असूनही प्रवाशांमध्ये भीती स्पष्टपणे दिसून येत आहे.

Web Title: Air India Plane Crash after Ahmedabad 4 more boing dreamliner flights make emergency landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.