शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विरोधानंतरही बाह्यवळणाचे काम

By admin | Updated: October 19, 2015 01:52 IST

पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगरसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणाचे काम वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्यातील बाह्यवळणासाठीची मोजणी मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.

राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगरसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणाचे काम वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्यातील बाह्यवळणासाठीची मोजणी मात्र अद्याप करण्यात आलेली नाही. या महामार्गावरील खेडच्या घाटाला पर्यायी बाह्यवळणाचे काम ठेकेदार कंपनीकडून जोरात सुरू आहे. हे बाह्यवळण गरजेचे नसल्याचा दावा करीत शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता. सध्याचा घाट रुंद करण्याला काहीही अडचण नसताना हे बाह्यवळण होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते. काही धनदांडग्यानी घेतलेल्या जमिनींना रस्ता मिळावा, म्हणून हा नवीन रस्ता करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. नवीन घाटरस्ता होत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या हरकतींवर सुनावणी न करता आणि त्यांना नुकसानभरपाई न देताच दांडगाईने हे काम करण्यात येत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. या रस्त्यात जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणी चालू असतानाच हे काम सुरू आहे. शेतजमिनींचे पंचनामे करण्यात आले असून संपादनाच्या नोटीसीमध्ये नमूद केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्षात रस्त्यात जात असलेले क्षेत्र यामध्ये तफावत आहे.दडपशाहीने काम सुरू असल्याचा आरोप>अधिकृत मोजणी न करताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. रस्त्यात जाणारी झाडे, विहिरी यांच्या नोंदी केलेल्या नाहीत. दडपशाहीने काम केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. >न्यायालयात नवीन रस्ता करीत असल्याचे म्हणणे न मांडता जुनाच रस्ता रुंद करीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे.