शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

इंदापूरात शेतीच्या नावाखाली अफूचे उत्पादन; ३ जणांना अटक, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:11 IST

पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता त्यांनी तपासणी केल्यावर अफूची झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले

कळस: न्हावी ता इंदापूर येथे शेतीच्या नावाखाली शेतमालात अफुसारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उत्पादन करणाऱ्या ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे २७ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. वालचंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करताना पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक, महसूल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह न्हावी गावात जाऊन मिळालेल्या माहितीचे आधारे शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी रतन कुंडलिक मारकड व बाळु बाबुराव जाधव यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड विक्री करण्याच्या उद्देशाने करून उत्पादन घेतल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले.  अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चहुबाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. त्यादरम्यान त्याच परिसरातील कल्याण बाबुराव जाधव (वय ६५ वर्षे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) हे त्यांच्या शेतात उपस्थित असताना त्या शेताची पाहणी केली असता, त्यांचे शेतांमध्ये देखील अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. या कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आलेली आहेत. आरोपींवर विरोधात वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा