शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

केवळ शेठजी-भटजीचेच सरकार नाही

By admin | Updated: August 14, 2015 03:01 IST

पूर्वी भाजपची शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळख होती. त्यामुळे आम्ही सत्तेबाहेर राहिलो. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेतल्यानंतर सत्तेत आलो आहे

पुणे : पूर्वी भाजपची शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळख होती. त्यामुळे आम्ही सत्तेबाहेर राहिलो. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेतल्यानंतर सत्तेत आलो आहे. त्यामुळे आम्हाला केवळ शेठजी-भटजीचा विचार करून चालणार नाही. शेतकरी व झोपडपट्टीतील शेवटच्या नागरिकांचेही विचार आमचे सरकार करीत आहे, अशी टिप्पणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. दि पूना मर्चंट्स चेंबरच्या बाबा पोखर्णा स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कारांचे वितरण पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट अध्यक्षस्थानी होते. बाबा पोकर्णा राज्यस्तरीय पुरस्कार केवलचंद्र कटारिया, जिल्हास्तरीय पुरस्कार नगराज जैन व भगवानदास सुगंधी यांना प्रदान करण्यात आला. तर वीरेन गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक करमरकर यांना देण्यात आला. त्या वेळी महापौर दत्तात्रेय धनकवडे, आमदार माधुरी मिसाळ, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, रायकुमार नहार, राजेंद्र तापडिया, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बाठिया आदी उपस्थित होते. राज्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एलबीटी रद्द केल्यामुळे ११ लाख व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून, ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या ११०० व्यापाऱ्यांना केवळ कर भरावा लागणार आहे. व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी सांगितले. केवळ पैशातून पैसा निर्माण करण्यापेक्षा व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. बाबा पोखर्णा यांचा आदर्श ठेवून सर्व व्यापाऱ्यांनी शेतकरी, हमाल व कामगारांचे हित जपले पाहिजे, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले. व्यापाऱ्यांनी सचोटीने काम केल्यास समाजाचा उत्कर्ष होतो. व्यापारी वर्गाने केवळ अन्याय सहन करीत राहू नये. तसेच, सत्तेत आल्यानंतर शेठजी-भटजीच्या पक्षाने व्यापाऱ्यांना विसरू नये, असे मनोगत केवलचंद कटारिया यांनी सत्काराला उत्तर देताना केले. प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)