पुण्यातून थेट एकच रेल्वे; मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वेगाड्या पुणे मार्गे धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:00 PM2020-05-21T15:00:53+5:302020-05-21T15:07:29+5:30

रेल्वे मंत्रालयाने देशभरातील विविध शहरांमधून रेल्वेसेवा सुरू करण्याचा घेतला निर्णय

Only one train directly from Pune; Five trains departing from Mumbai will run via Pune | पुण्यातून थेट एकच रेल्वे; मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वेगाड्या पुणे मार्गे धावणार 

पुण्यातून थेट एकच रेल्वे; मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वेगाड्या पुणे मार्गे धावणार 

Next
ठळक मुद्दे२०० गाड्यांमध्ये थेट पुण्यातून सुटणारी केवळ दानापुर एक्सप्रेस ही एकमेव गाडीदुसऱ्या टप्प्यात थेट पुण्यातून आणखी काही गाड्या सुरू होण्याची शक्यता

पुणे : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील विविध शहरांमधून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. १ जूनपासून २०० रेल्वेगाड्या धावणार आहे. पण थेट पुण्यातून केवळ दानापुर एक्सप्रेस या एकमेव गाडीला मंजुरी मिळाली आहे. मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वेगाड्या पुणे मार्गे धावणार आहेत. पुणे रेड झोन असल्याने तसेच सध्या श्रमिक ट्रेनही धावत असल्याने अधिक रेल्वेगाड्यांना मिळाली नसल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून रेल्वे ठप्प आहेत. काही दिवसांपासून देशभरात श्रमिक रेल्वे गाड्या धावत आहेत. ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मुजर, कामगारांना मुळ गावी नेण्यासाठी या गाड्यांना विशेष मंजुरी दिली जात आहे. आता या गाड्यांबरोबरच नियमित स्वरूपात देशभरात २०० गाड्या दि. १ जूनपासून धावणार आहेत. या गाड्यांचे सर्व डबे आरक्षित असणार असून गुरूवार (दि. २१) पासून आरक्षण खुले करण्यात आले आहे. आरक्षणाशिवाय एकाही प्रवाशाला या गाड्यांमधून प्रवास करता येणार नाही. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पॅन्ट्री कार असलेल्या गाडीमध्येच पाणी व इतर काही मोजके खाद्यपदार्थ देण्याची सुविधा असेल. प्रवाशांना घरूनच पाणी व खाद्यपदार्थ घेऊन यावेत, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या २०० गाड्यांमध्ये थेट पुण्यातून सुटणारी केवळ दानापुर एक्सप्रेस ही एकमेव गाडी आहे. मुंबईतून पुणे मार्गे जाणाऱ्या पाच गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये गदग एक्सप्रेस, कोनार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, हुसेनसागर एक्सप्रेस व गोवा एक्सप्रेस या गाड्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंडळाने या मार्गांची निवड केलेली आहे. पुणे हे सध्या रेड झोनमध्ये आहे. तसेच पुण्यासह, सातारा, कोल्हापुर, मिरज या भागातून दररोज श्रमिक गाड्या धावत आहेत. आतापर्यंत ७० हून अधिक गाड्या धावल्या आहेत. मुंबईतून पुणे मार्गे धावणाऱ्या पाच गाड्याही आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात थेट पुण्यातून आणखी काही गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.
-----------------
दि. १ जून पासून पुण्यातून धावणाºया गाड्या -
- पुणे त दानापुर एक्सप्रेस
- मुंबई सीएसटी -भुवनेश्वर कोनार्क एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- मुंबई सीएसटी - गडग एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- मुंबई सीएसटी - बेंगलुरू उद्यान एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- मुंबई सीएसटी - हैद्राबाद हुसेनसागर एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- वास्को द गामा - निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस (पुणे मार्गे)

Web Title: Only one train directly from Pune; Five trains departing from Mumbai will run via Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.