शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड वॉररूम हेल्पलाईनच्या दहापैकी एकच क्रमांक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:10 IST

पुणे : पुणे महापालिकेच्या कोविड वॉररूमद्वारे (टेलिफोनिक कॉल सेंटर) रुग्णालयातील बेड मिळविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, दहा टेलिफोन लाईनपैकी केवळ ...

पुणे : पुणे महापालिकेच्या कोविड वॉररूमद्वारे (टेलिफोनिक कॉल सेंटर) रुग्णालयातील बेड मिळविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, दहा टेलिफोन लाईनपैकी केवळ एकच क्रमांक चालू असल्याचे शुक्रवारी महापालिकेच्या आयटी व टेलिफोन विभागाकडून स्पष्ट केले आहे़ त्यामुळे आत्तापर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास महापालिकेच्या वॉररूममध्ये दहा संपर्क उपलब्ध करून देण्यात आल्याची पदाधिकाऱ्यांसह इतर विभागांनी दिलेली माहिती पूर्णत: चुकीची निघाली असून, ०२०-२५५०२११० हा क्रमांक वगळता इतर सर्व क्रमांक वारंवार व्यस्तच लागत आले आहेत़

दरम्यान, आजपर्यंत किंबहुना कोरोना आढावा बैठकीसाठी आज (दि. १६) तयार केलेल्या साप्ताहिक अहवालामध्येही महापालिकेने कोविड वॉररूम कॉल सेंटरचे पुन्हा पाच हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून तीच चूक केली आहे़ प्रत्यक्षात मात्र ०२०-२५५०२११० हा क्रमांक वगळता इतर सर्व क्रमांक हे अंतर्गत म्हणजेच हंटिंग लाईन आहेत़

महापालिकेच्या आयटी विभागाने (माहिती व तंत्रज्ञान विभाग) दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरकरिता दूरध्वनी विभागामार्फत ०२०-२५५०२११० ही मुख्य हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आली आहे़ या लाईनवरती १० दूरध्वनी लाईन्स मागणीनुसार त्वरित कार्यान्वित केल्या आहेत़ त्यामुळे ०२०-२५५०२११० या क्रमांकावर फोन आल्यास तो इतर दहा क्रमांकापैकी १० पैकी जी लाईन फ्री आहे त्यावर वर्ग होतो. परंतु, हेल्पलाईनचे १० ही नंबर जाहीर केले गेल्यामुळे, त्या त्या वैयक्तिक नंबरवर फोन केल्यास ते फोन क्रमांक वारंवार व्यस्तच लागत आले आहेत़ तसेच वॉररूममध्येही पुरेसा सेवक वर्ग कार्यरत नसल्यामुळेही नागरिकांच्या दूरध्वनींना उत्तर देण्यासाठी ते उचलले जात नाहीत किंवा ते व्यस्त लागत आहेत़ त्यामुळे वॉररूमध्ये अधिकचा सेवक वर्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आयटी व टेलिफोन विभागाने आरोग्य विभागाकडे केली आहे़

---------------------------------